Type Here to Get Search Results !

केज विधानसभेसाठी संदीपान (तात्या) हजारे यांना उमेदवारी देण्यात यावी कार्यकर्त्यांची मागणी


 केज विधानसभेसाठी संदीपान (तात्या) हजारे यांना उमेदवारी देण्यात यावी कार्यकर्त्यांची मागणी


केज/प्रतिनिधी 


नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. आणि आता विधानसभेची पुर्वतयारी जोरात सुरु झाली आहे. तसा केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ असल्याने या मतदार संघातील अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे आज पहावयास मिळत आहे.

त्यातच ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य समाजासाठी समाजातील जनतेच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडविण्यासाठी घालवले मात्र त्यांनी कधीच आपले स्वहित पाहीले नाही.असे  केज शहराचे रहिवाशी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष, निष्ठावंत जेष्ठ नेते  आदरणीय संदीपान तात्या हजारे यांना विधानसभा २०२४ या केज मतदार संघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मा.खा.रामदासजी आठवले यांनी उमेदवारी देऊन एका जुन्या  पॅंथरला न्याय द्यावा अशी मागणी केज येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली आहे.


सविस्तर माहिती अशी कीज् लोकसभेच्या निवडणुकी नंतर आता तयारी सुरू झाली आहे. ती म्हणजे विधानसभेची गेल्या अनेक वर्षांपासून केज मतदार संघ हा राखीव मतदार संघ राहिला परंतु या मतदार संघात बौध्द समाजाच्या उमेद्वाराला कधीच न्याय मिळाला नाही.तशी केज मतदार संघात बौध्द मतदारांची संख्या जास्त आहे. परंतु या समाजाला या राजकीय वर्तुळात कधीच येवु दिले गेले नाही. दलित पँथरच्या काळापासून दलित बांधवांवर होणारे अन्याय अत्याचाराच्या विरोधात सर्व ताकतीने उभे राहाणारे आणि पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष मा.खा.रामदाजजी आठवले यांच्या सोबत राहुन एकनिष्ठेने पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेऊन ती समर्थपणे पेलुन आजतागायत ते पक्षाचे काम करत आहेत.ते नाव म्हणजे केज शहराचे रहिवाशी मा.संदिपान तात्या हजारे हे होय.ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी काम करत आहेत. खा.आठवले साहेब गेल्या कित्येक वर्षांपासून सत्तेत राहिले. परंतु संदीपान तात्या हजारे यांनी कधीच आपला स्वार्थ आणि स्वहित पाहीले नाही. ते आत्तापर्यंत लढले ते फक्त आणि फक्त समाजासाठी समाजाच्या प्रश्नांसाठी.. त्यामुळे यावेळी तरी या निस्वार्थी नेत्याला केज मतदार संघाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा मा.खा.रामदास आठवले यांनी उमेदवारी देऊन या मतदार संघाला एक नवा चेहरा द्यावा.अशी मागणी केज येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा.नवनाथजी तपसे, ता.उपाध्यक्ष व्यंकट हजारे, ता.कार्याध्यक्ष मा.ईश्वर (भाऊ) सोनवणे,ता.कोषाध्यक्ष अंगद शिनगारे, यांचेसह बाळासाहेब ओव्हाळ, अमोल मस्के यांचेसह अनेक कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.तर या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मराठा आघाडीच्या केज तालुका अध्यक्षपदी मा.सुग्रीव (भाऊ) बसवर यांची नियुक्ती पत्र देवुन सर्वानुमते निवड करण्यात आली.




Post a Comment

0 Comments