Type Here to Get Search Results !

आनंद नगरीला वीज पुरवठा करणारे केबल भर पावसात व पाण्यात उघड्यावरच यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल

 महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका 

आनंद नगरीला वीज पुरवठा करणारे केबल भर पावसात व पाण्यात उघड्यावरच यास जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल




केज/प्रतिनिधी


महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून महावितरण कार्यालयाच्या विद्युत रोहित्राच्या बोर्डामधुन आनंद नगरीला वीज पुरवठा करणारे केबल जमिनीवर भर पावसात व पाण्यात उघड्यावरच आहेत यास जबाबदार कोण?असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,पंचायत समिती च्या प्रांगणामध्ये महा वितरण कार्यालयाचे दोन विद्युत रोहित्र आहेत सदर रोहित्राचे वीज पुरवठा करणारे केबल (वायर) उघड्यावर आहेत व या रोहित्राचे फ्युज फुटलेले आहेत.मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी केज शहरात पंचायत समितीच्या प्रांगणावर आनंदनगरी आलेली आहे. सदर रोहित्रा मधून महा वितरण कार्यालयाने आनंद नगरीला वीज पुरवठा दिला आहे.परंतु सदर वीज पुरवठा करणारे केबल (वायर) हे जमिनी वर पावसात,पाण्यात, चिखलात उघडे आहे सदर केबलला जॉईंट आहेत व सदर केबलच्या वरील भागाचे कव्हर निघलेले आहे व आनंद नगरीचा लाईटचा बोर्ड देखील उघड्यावरच आहे त्या बोर्डामध्ये देखील लाईटचे वायर व फ्युजच्या तारा उघड्या पावसामध्येच आहेत.या प्रांगणाच्या जवळच एक शाळा, शिक्षकांची सहकारी पतपेढी गटशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय आहे.या शाळेतीलविद्यार्थी हे या प्रांगणावरती खेळत आहेत व अहिल्यादेवी नगर,वकीलवाडी या भागातील नागरिक हे देखील या ठिकाणाहून रहदारी करत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे यास कोण जबाबदार ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. महावितरण कार्यालयाने आनंद नगरीला विज पुरवठा हा जमिनीतून न करता तो वीजपुरवठा करणारे केबल वायर हे विद्युत रोहित्राच्या पोल वरून अथवा लाकडाच्या सहाय्याने वरती बांधून द्यायला पाहिजे होते असे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे. 

महावितरण कार्यालयाचे कर्मचारी लाईनमन हनुमंत बिडकर यांच्या मोबाईल क्र. ९१७५८७५१६२ या दूरध्वनीवरून आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे मोबाईल दूरध्वनीवर सांगण्यात येत होते.

महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अंडील साहेब यांच्या मोबाईल क्र. ७८७५२६३८९५ या दूरध्वनीवर आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचेसांगण्यात येत होते.

Post a Comment

0 Comments