Type Here to Get Search Results !

मागील चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकानदारासह रेशन धारक ग्राहकांना त्रस्त.

 मागील चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकानदारासह रेशन धारक ग्राहकांना त्रस्त.



केज/प्रतिनिधी


मागील चार दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे केज शहरासह केज  तालुक्यातील रेशन दुकानदार व रेशनधारक ग्राहक त्रस्त झाले आहेत. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तहसील कार्यालया अंतर्गत ग्राहकांना स्वस्त धान्य सोसायटी व रेशन दुकानामार्फत रेशन धारकांना माल वितरित केला जात आहे.सध्या सदर माल ऑनलाइन पद्धतीने वितरित केला जात आहे परंतु मागील चार दिवसापासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे रेशन दुकानदार व रेशन धारक ग्राहक परेशान झाले आहेत.ऑनलाइन करण्या साठी मशीनला ग्राहकांना  अंगठा दिल्यानंतर रेशन दुकानदारांकडून माल मिळत आहे.शासनाने तात्काळ सर्व्हरची दुरुस्ती करून ग्राहकांना माल देण्याची मागणी केली जात आहे.दोन तीन दिवसापासून पाऊस चालू आहे रेशन दुकानाच्या मालासाठी ग्राहक हे पावसात दुकानात चकरा मारत आहे सदरच्या तक्रारीमुळे दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत आहे.

Post a Comment

0 Comments