Type Here to Get Search Results !

प्रोफेसर विजय कोठेकर जीवविज्ञान व्याख्यान मालेचे आयोजन.आभासी पद्धतीने होणार प्रक्षेपण.

 प्रोफेसर विजय कोठेकर जीवविज्ञान व्याख्यान मालेचे आयोजन.आभासी पद्धतीने होणार प्रक्षेपण.


केज/प्रतिनिधी


श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस संचलित बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज व श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड,तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव व कै.शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय,धर्मापुरी जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोफेसर विजय कोठेकर जीव विज्ञान व्याख्यानमाला २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.सदरील व्याख्यान माला दिनांक ५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२४ या दरम्यान आभासी- ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली आहे. प्रोफेसर विजय कोठेकर जीव विज्ञान व्याख्यान माला २०२४ सहा विविध सञामध्ये संपन्न होणार आहे.दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता,प्रथम सञामध्ये व्याख्यानमालेचे उद्घाटन प्रोफेसर अरविंद धाबे,वनस्पतीशास्त्र अभ्यासमंडळ प्रमुख व विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ  छत्रपती संभाजीनगर व प्रमुख पाहुणे प्रोफेसर निखिल गायकवाड, वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.प्रथम सत्राचे व्याख्याते म्हणून प्रोफेसर गजानन झोरे,केंद्रीय विद्यापीठ राजस्थान हे जीव विज्ञानामधील प्रगत तंत्र ज्ञानाचा वापर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर मुकुंद कुलथे,मिलिंद विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर हे असणार आहेत.व्याख्यान मालेच्या द्वितीय सत्राचे व्याख्याते म्हणून डॉ. सरिता भुतडा,विभाग प्रमुख,सूक्ष्मजीवशास्त्र विभाग संजीवनी महा विद्यालय कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या असणार आहेत.शरीर संवर्धनासाठीअत्यावश्यक असणाऱ्या घटकासंदर्भात त्या मार्गदर्शन करणार आहेत.सदरील सञाचे अध्यक्ष म्हणूनप्राध्यापिका डॉ.पायल आचरेकर, वनस्पतीशास्त्र विभाग, जयहिंद कॉलेज मुंबई या आहेत.व्याख्यानमालेच्या तृतीय सत्राचे प्रमुख व्याख्याते प्रोफेसर डॉ. दत्ता ढाले,पदव्युत्तर विभागप्रमुख वनस्पती शास्त्र विभाग,घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे हे महाराष्ट्रातील औषधी वनस्पती संदर्भात मार्ग दर्शन करणार आहेत.या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रोफेसर प्रताप नाईकवाडे  वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आठले,सत्रे,पित्रे महाविद्यालय देवरुख, जिल्हा रत्नागिरी हे असणार आहेत.व्याख्यान मालेच्या चतुर्थ सत्राच्या व्याख्यात्या म्हणून डॉ.  माला निगाय, वनस्पती शास्त्र विभाग डॉ.एपीजे अब्दुल कलाम शासकीय महाविद्यालय कोलकत्ता, पश्चिम बंगाल या वनस्पती चे शाश्वत आयुष्यासाठीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर मिलिंद जाधव वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख,सर सय्यद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर हे असणार आहेत.व्याख्यानमालेच्या पाचव्या सत्राच्या व्याख्यात्या म्हणून प्राध्यापिका डॉ.पूजा सूर्यवंशी,वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख बी व्ही भूमरड्डी महाविद्यालय बिदर,कर्नाटक या वनस्पतीचे औषधीगुणधर्म याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल क्षीरसागर वनस्पतीशास्त्र विभाग,शिवाजी महा विद्यालय कन्नड,जिल्हा छत्रपती संभाजी नगर हे असणार आहेत.व्याख्यान मालेच्या सहाव्या सत्राचे व्याख्याते म्हणून डॉ. संदीप चव्हाण संशोधक मायो क्लिनिक रॉनचेस्टर मायनसटा,अमेरिका हे मानवी शरीरामधील कर्क रोगाचे विश्लेषण व एकत्रित उपाय याविषयी मार्गदर्शन करणारआहेत . या सत्राचे अध्यक्ष प्रोफेसर संजय दळवी,वनस्पती शास्त्र विभागप्रमुख श्री गुरु बुद्धीस्वामी महा विद्यालय पूर्णा,जिल्हा परभणी हे असणार आहेत.प्रोफेसर विजय कोठेकर जीवविज्ञान व्याख्यानमाला २०२४  महाविद्यालयीन विद्यार्थी , संशोधक विद्यार्थी, विज्ञान विषयाचे अध्यापक, प्राध्यापक या सर्वांसाठी उपयुक्त व मोलाची असणार आहे.जीवविज्ञान शास्त्रामधील विविध विषयांमध्ये संशोधन व मार्गदर्शन क्षेत्रात पारंगत असणारे व्याख्यातेयामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. सदरील व्याख्यानमाला ऑनलाइन /आभाशी पद्धतीने होणार आहे. व्याख्यानमालेची वेळ ५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट च्या दरम्यान रोज सकाळी १०-३० वाजता (Zoom Meeting app)आभासी पद्धतीने सुरू होईल.या व्याख्यानमाले मध्ये शिक्षक,प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी,महा विद्यालयीन विद्यार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन मार्ग दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख आयोजक प्रोफेसर नवनाथ काशीद, वनस्पतीशास्त्र विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय केज तसेच सहसंयोजक डॉ.संतोष तळेकर,श्रीमती केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालय बीड व श्रीमती अर्चना मुखेडकर, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महा विद्यालय कळंब जिल्हा धाराशिव व डॉ.शीला शिंदे,वनस्पतीशास्त्र विभाग कै.शंकरराव गुट्टे ग्रामीण महाविद्यालय धर्मापुरी,जिल्हा बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.प्रोफेसर विजय कोठेकर जीवविज्ञान व्याख्यानमालेच्या आयोजना संदर्भात बाबुरावजी आडसकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव फावडे सर व श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था आडस सचिव रमेशरावजी आडसकर,संचालिका सौ. अर्चनाताई आडसकर व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी व्याख्यान मालेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य व शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments