Type Here to Get Search Results !

केज येथे ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गुरुपोर्णिमा उत्सव उत्साहात साजरा.

 केज येथे ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गुरुपोर्णिमा उत्सव उत्साहात साजरा.



केज /प्रतिनिधी 


केज शहरातील वृंदावन धाम येथे ठाकुर रामकृष्ण परमहंस परिवाराच्या वतीने गुरुपोर्णिमा उत्सव उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.ठाकुर रामकृष्ण रामकृष्ण परमहंस परिवाराची स्थापना वै.प.पु. वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने झाली.ठाकुर रामकृष्ण परमहंस,शारदामाता, स्वामी विवेकानंद व वै.प.पु.वासुदेवराव खंदारे गुरुजी यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करुन वंदन करण्यात आले.त्यानंतर आईंच्या पाद्यपुजनानंतर हनुमान चालीसा,हरीपाठ घेण्यात आला.यावेळी ठाकुर रामकृष्णपरिवाराचे महाराष्ट्रातुन सर्व साधक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.यावेळी हरीवचन. ओआरजी या वेबसाईटचे उदघाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेबसाईटवर ठाकुर रामकृष्ण परिवाराचे सर्व उपक्रम दाखविण्यात येणार आहेत.तसेच सौ.रमाभाभी रिणवा यांनी  स्वतः लिहिलेल्या ज्ञानेश्वरी   ग्रंथाचे अनावरण मान्यवरां च्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुञ संचालन ठाकुर रामकृष्ण परिवाराचे ह.भ.प.श्री. समाधान महाराज शर्मा यांनी केले.महाप्रसादाने गुरुपोर्णिमा उत्सव कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments