Type Here to Get Search Results !

केज शहरात विठ्ठल बिरुदेव यांची परज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न भंडाऱ्याची उधळण करत ढोलांचा गजर व विठ्ठल बिरुदेवांच्या जयघोषाने केज शहर दुमदुमले.

 केज शहरात विठ्ठल बिरुदेव यांची परज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

भंडाऱ्याची उधळण करत ढोलांचा गजर व विठ्ठल बिरुदेवांच्या जयघोषाने केज शहर दुमदुमले.




केज/प्रतिनिधी


गुरुपौर्णिमा निमित्त केज शहरात विठ्ठल बिरुदेव यांची परज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.भंडाऱ्याची उधळण व ढोलांचा गजर करत विठ्ठल बिरुदेवाच्या जय  घोषाने केजशहर दुमदुमुन गेले.विठ्ठल बिरुदेव परज यात्रेचे आयोजन केज शहरातील धनगर समाज बांधवांच्या वतीनेकरण्यात आले होते.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी रवीवार दि.२१ जुलै २०२४रोजी विठ्ठलबिरुदेव यांची परज यात्रा ही गेले अनेक दशकापासून धनगर समाज बांधव हे केज शहरात मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत.दिनांक २१ जुलै २०२४ रोजी सकाळी ९-३० वाजता केज शहरा तील शनी मंदिर या भागा तील राजेभाऊ डुकरे यांच्या घरी होऊन परज यात्रेला प्रारंभ करण्यात आला.राजेभाऊ डुकरे यांच्या घरी येऊन परज यात्रा शनी मंदिर मार्गे मंगळवार पेठ कॉर्नर,मेन रोडने कानडीचौक,कानडी रोड मार्गे वकीलवाडी येथील हनुमान मंदिर, पंचायत समिती ग्राउंड मार्गे उमरी रोडने खंडोबा मंदिर,उमरी रोडने शिक्षक कॉलनी मार्गे बीड रोडने आयटीआय कॉलेज पासून विठ्ठल बिरुदेव मंदिर येथे परज यात्रा पोहोचल्यानंतर तेथेविठ्ठल बिरुदेव यांच्या धनगरी ओव्याचा कार्यक्रम घेऊन विठ्ठल बिरुदेव यांचा लग्नविधी सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर विठ्ठलबिरूदेवांची महाआरती घेण्यात आली. या विठ्ठल बिरुदेव यात्रेचे मुख्य आकर्षण हे विठ्ठल बिरुदेव यांचे इरकरी हे खांद्यावरी घोंगडीचा साज घेऊन हातात तलवार घेऊन व येतकरी हातात येत घेऊन ढोलांच्या, झांजांच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करत विठ्ठल बिरुदेवांच्यानावांचा जयघोष करत खेळत असतात.विठ्ठल बिरुदेव यांच्या महाआरतीनंतर केज शहरातील धनगर समाज बांधवांनी विठ्ठल बिरुदेव यात्रेला आलेल्या भाविक भक्तांसाठी उत्कृष्ट महाप्रसादाची व्यवस्था केली होती.यावेळी शंभू देव रोडे,राजाभाऊ डुकरे, शिवाजी चेपट,नगरसेवक बाळासाहेब गाढवे,माजी नगरसेवक अंगद गाडवे, रोहिदास गाढवे,रामडुकरे, पिंटू गाढवे,ओम चादर, पप्पू रोडे,बालासाहेब भुतकर,सुखदेव लांडगे, बालाजी गायके,बाबू रोडे, संतोष निगुळे,आबासाहेब लांडगे,पंडित डुकरे,वसंत सौदागर,बबन गायके यांच्यासह विठ्ठल बिरुदेव यांचे इरकरी,महिला, युवक,नागरिक व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते.

Post a Comment

0 Comments