Type Here to Get Search Results !

गायरानसाठी करचुंडी येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन

 गायरानसाठी करचुंडी येथील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन  



बीड/ प्रतिनिधी 



करचुंडी  समस्त गावकरी बहुजन बांधव यांचे वतीने करचुंडी येथील गायरान जमिनीचे कायदेशीर अधिकार म्हणजे, गायरान जमिन  असणाऱ्या  शेतकऱ्यांच्या नावाने ७/१२ उताऱ्यावर त्याची नोंद करणे इत्यादी मागणी करीता ते बीड जिल्हयातील खेडयापाडयातील गायरान जमिनीचा वापर करुन त्यावर अनेक प्रकारचे पीके घेवून आपले कुंटूंबाचे पालनपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना या मागणीचा लाभ घेणे करीता दिनांक २० जुलै २०२४ पासून ते मागणी मान्य झालेचे लेखी पत्र संबंधित अधिकाऱ्याचे सहीचे मिळेपर्यंत करचुंडी गावातील गरीब दास महाराज सभागृह येथे बेमुदत धरणे आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालय समोर सुरू मौजे करचुंडी येथील जमीन नसलेल्या शेतकऱ्यांनी गावालगत असणारी (गायरान) जमीनीवर विविध प्रकारची नगदी पिके घेवून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर या गावचे शेतकरी आपले कुंटूंबाचे उदरनिर्वाह पालनपोषण करीत आहे. या गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या मिळणाऱ्या अनेक सरकारी सुख सुविधा मिळत नाहीत. या गावातील बरेच शेतकरी अल्पभुधारक आहेत.

आम्ही समस्त गावकरी करचुंडी येथील गायरान जमीन शेतकऱ्यांच्या नावावर होवून त्या जमिनीचा त्याला ७/१२ उतारा देणेकामी शासन स्तरावर व राजकीय स्तरावर वेगवेगळे पत्रव्यवहार केलेले आहेत. गायरान जमिनीचे कायदेशीर हक्क नसलेमुळे शेतकऱ्यांना शेतीला पुरक दुसरे जोडधंदे नाहीत. ना जमिनीत वीज घेता येते ना शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात. तरी शेतकऱ्यांना अनुदान व पीकविमा योजना देवून या सर्व अडचणीतून बीड जिल्हयातील शेतकरी मुक्त झाला पाहिजे. तो प्रगतीशील शेतकरी झाला पाहिजे. हीच मागणी घेवून समस्त गाव मौजे करचुंडी ता. जि. बीड येथील गरीब दास महाराज सभागृह येथे  शेकडो शेतकरी समूहाच्या उपस्थितीमध्ये सकाळी १० ते रात्री १२ वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. सदरचे रॅली आंदोलन हे करचुंडी ते बीड पायी रैली दि.२२जुलै २०२४ रोजी जिल्हयातील खेडयापाडयातील गायरान जमीन वापर करणाऱ्या शेतकऱ्यांकरीता असणार आहे. सदरचे आंदोलन हे पुर्णपणे शांततेत व लोकशाही मार्गाने होणार. प्रशासकीय यंत्रणेला कुठलाही त्रास होणार नाही याची आंदोलन शिष्टमंडळाच्या वतीने दक्षता घेतली आहे. आंदोलनामध्ये छोटेखानी भीमगीत गायनाचा व्याख्यान, प्रबोधन इत्यादी तसेच संविधान जनजागृती इत्यादी विषयावर चर्चा होणार आहे. तरी बेमुदत धरणे आंदोलनाला गालबोट लागू नये. सामाजिक शांततेचा भंग होऊ नये करीता आंदोलनाला कुठलेही अडचण येऊ नये करीता पोलीस परवानगी स्पिकर परवाना व पोलीस संरक्षण करीता मागणी करीत आहोत. आंदोलनातील मुख्य मागणी मान्य होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याच सहीचे मागणी मान्य झालेचे पत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणा बेमुदत धरणे आंदोलनातून मागणी मान्य न झालेस पुढे आंदोलनाची दिशा बद आंदोलन ऐवजी प्रेमनाथ अमर उपोषणाला सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments