Type Here to Get Search Results !

बेजबाबदारपणे कर्तव्यात कसूर करणारे सहशिक्षक बापू राजगिरे यांना तात्काळ निलंबित करावे - समाधान बचुटे मागण्या मान्य न केल्यास गुरुवारी शाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा इशारा

 बेजबाबदारपणे कर्तव्यात कसूर करणारे सहशिक्षक बापू राजगिरे यांना तात्काळ निलंबित करावे - समाधान बचुटे

मागण्या मान्य न केल्यास गुरुवारी शाळेला कुलूप ठोकण्याचा पालकांचा इशारा



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील शेलगाव गांजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक बापू राजगिरे हे शाळेत बेजबाबदारपणे कर्तव्यात कसूर करत आहेत.म्हणून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशा मागणीचे लेखी निवेदन गटशिक्षणाधिकारी केज यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव, पालक समाधान बचुटे यांच्यासह इतर पालकांनी दिले आहे. गटशिक्षणाधिकारी यांनी पालकांच्या मागण्या मान्य न केल्यास गुरुवारी शाळेला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांची शाळा रस्त्यावर भरवण्यात येईल असा इशारा पालकांनी दिला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव गांजी ही शाळा साळेगाव केंद्र अंतर्गत चालू आहे. या शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक आहे.विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याच्या कामासाठी शासन लाखो रुपये पगार हा शिक्षकांना देत आहे व शिक्षणापासून मुले वंचित राहू नयेत म्हणून शासन विविध योजना राबवत आहे. 

परंतु बापू राजगिरे हे शाळेत सतत गैरहजर राहत आहेत बापू राजगिरे  हे कसलेही प्रकारची रजा न देताच सतत शाळेत गैरहजर राहत आहेत त्यांना नेमके कोणाचे अभय आहे ? तसेच बापु  राजगिरे हे कर्तव्यावर शाळेत येताना सकाळीच दारू पिऊन येत आहेत ते दारू पिऊन शाळेत आले की,मुले त्यांना पाहून घाबरून जात आहेत बापू राजगिरे हे बेजबाबदार पणे कामात कसूर करत आहेत.त्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,पालक व ग्रामस्थांनी वेळोवेळी सांगितले की,तुम्ही दररोज शाळेत येऊन मुलांना चांगले शिकवा व शाळेत येताना दारू पिऊन येत जाऊ नका परंतु ते शाळेत रजा न देता सतत गैरहजर राहतात व शाळेत कर्तव्या वर असताना दारू पिऊनच मुलांना शिकवत आहेत अशा बेजबाबदार बापू राजगिरे यांना तात्काळ निलंबित करावे. त्यांच्या जागेवर दुसरे एक शिक्षक दोन दिवसात देण्यात यावा.गेल्यावर्षी आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे याही वर्षी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे व मुले शिक्षणापासून वंचितराहत आहेत यास कोण जबाबदार आहे ?तसेच या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीस आपण व आपले कर्मचारी आणि सदर शिक्षक जबाबदार राहतात याची नोंद आपण व आपल्या वरिष्ठांनी घेण्यात यावी. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,पालक व गावकरी  आम्ही सर्वजण गेल्या वर्षापासून आपणास वेळी लेखी तक्रार करून व प्रत्यक्षात भेटून देखील आमच्या गावच्या शाळेला चांगले शिक्षक दिले नाहीत.पिसेगाव येथील शाळेत बापू राजगिरे हे वादग्रस्त ठरलेले असताना देखील आपण त्यांना आमच्या गावच्या शाळेत का पाठवले आहे ?या     बेजबाबदार बापू राजगिरे यांच्यावर आपला व आपल्या कर्मचारी यांचा अंकुश राहिला नाही काय? ते शाळेत दारू पिऊन येऊन मुलांना कसे काय शिकवतात?बापु राजगिरे सतत रजा न देताच गैरहजर कसे काय राहतात ? मागील दोन वर्षापासून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यासकोण जबाबदार आहे ? राजगिरे यांना कोण पाठिशी घालत आहे  ? याची आपण स्वतः चौकशी करावी व सदर चौकशी कामे शालेय व्यवस्थापन समिती, पालक यांना विचारात घ्यावे.दिनांक ३ जुलै २०२४ रोजी आपणास दिलेल्या लिखित तक्रारी च्या अनुषंगाने आपण काय कार्यवाही केली आहे ? सदर प्रकरणी चौकशी कामे शिक्षण विस्तार अधिकारी श्री सुनील केंद्रे यांना नियुक्त केले होते परंतु त्यांनी पालकांना विचारात घेतले नाही व पालकांचे म्हणणे जबाब घेतला नाही. त्यामुळे आपण यापुढे स्वतः सदर प्रकरणी चौकशी करावी व शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांना विचारात घेऊन चौकशी करावी.आपण आपल्या कर्मचारी यांच्यामार्फत चौकशी करण्यास आमचा विरुद्ध आहे कारण ते शिक्षकाला पाठीशी घालत आहेत.बापू राजगिरे हे मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून शासनाची देखील फसवणूक करून लाखो रुपये पगार घेत आहेत त्यांच्या या गैर वर्तनामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून आमच्या गावच्या शाळेला एक कायमस्वरूपी शिक्षक देण्यात यावे जेणेकरून मुलांचे यावर्षीचे तरी शैक्षणिक नुकसान होणार नाही.बापू राजगिरे हे पिसेगाव येथे वादग्रस्त ठरले असताना आमच्या शाळेत का दिले? बापू राजगिरे सरांना तात्काळ निलंबित करावे म्हणजे मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबेल,आमच्या गावच्या शाळेला दुसरे एक शिक्षक देण्यात यावेत,अन्यथा आपण आपल्या मार्फत आमच्या मुलांचे टीसी देण्यात यावेत,जर आमच्या शाळेला दुसरे शिक्षक द्यायचे नसतील तर आम्हाला आमची मुले दुसऱ्या शाळेत पाठविण्याची परवानगी देण्यात यावी असे पालकांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.आमच्या मागणीची पूर्तता न केल्यास दिनांक २५ जुलै २०२४ रोजी शाळेला कुलूप ठोकून मुलांची शाळा ही रस्त्यावर भरवण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.सदर निवेदनाच्या प्रती गटशिक्षणाधिकारी केज,  जिल्हाधिकारी बीड, मुख्यकार्यकारी अधिकारी बीड,तहसीलदार केज, गटविकास अधिकारी केज,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे युसूफ वडगाव,केंद्रप्रमुख साळेगाव यांना दिल्या आहेत तर या निवेदनावर समाधान बचुटे,उद्धव जाधव,उत्तरेश्वर बचुटे, बाबुराव जाधव,विठ्ठल पटणे, दत्तात्रय पटणे, सुनील जाधव,बसलिंग पटणे यांच्यासह ३० जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

गांजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू राजगिरे यांच्या विरुद्ध पालक व ग्रामस्थांनी तक्रार केली आहे सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन शिक्षण विस्तार अधिकारी सुनील केंद्रेकर यांना सदर प्रकरणी चौकशी अहवाल तयार करण्यास आदेश दिले व त्यांनी मंगळवारी चौकशी अहवाल मला सादर केला आहे त्या अनुषंगाने मी माझ्या वरिष्ठांना आज रोजी सदर अहवाल सादर करून बापू राजगिरे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणिचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. तसेच थोड्याच दिवसात शिक्षकांचे समायोजन होणार आहे या समायोजनामध्ये वरिष्ठांकडून पाठपुरावा करून  प्रथम प्राधान्य देऊन गांजी येथील शाळेस शिक्षक नियुक्त करुत. 

गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments