Type Here to Get Search Results !

केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा.

 केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा.



केज/प्रतिनिधी 


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ जुलै ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्या बाबत कळविण्यात आले होते.शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट अभ्यासक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता.ज्यात शिक्षण व विकासाच्या विविधपैलूंचा समावेश आहे 

१.अध्ययन अध्यापन साहित्य दिवस 

२.मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस 

३.क्रीडा दिवस 

४.सांस्कृतिक दिवस

 ५.कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस 

६.मिशन लाईफचंद्रची शेतात एको क्लब /शालेय पोषण दिवस 

७.समुदाय सहभाग दिवस

या उपक्रमाने सप्ताह साजरा करण्यात आला पहिल्या दिवशी शिक्षकाने आपापल्या विषयाचेस्वतः शैक्षणिक साहित्य बनवून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन केले तसेच दुसऱ्या दिवशी अध्ययन स्तर निश्चित करूनत्यांच्या मध्ये एफएलएम पूर्ण करण्याच्या दृष्टीनेनियोजन करून पूर्ण करण्याचा संकल्प केला.तसेच तिसऱ्या दिवशी क्रीडाच्या माध्यमातून देशी खेळांना प्राधान्य देऊन विद्यार्थ्यां मध्ये खेळाची आवड निर्माण केली तसेच लोकगीत,शेतकरी गीत, पोवाडा,कथाकथन, काव्यवाचन,देशभक्तीपर गीत यांचे सादरीकरण करून सांस्कृतिक दिन साजरा केला.यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला तसेच इको क्लबच्या माध्यमातून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देऊन तीस देशी वृक्षांचे वृक्षारोपण व प्रधानमंत्री पोषणशक्तीच्या माध्यमा तून आपल्या शरीराला आवश्यक पोषणतत्वाचे महत्व प्रोटीन,व्हिटॅमिन, कार्बोहायड्रस,फॅट इत्यादी च्या माध्यमातून पटवून दिले तर दिनांक २८ जुलै  २०२४ रोजी रवीवारी पालक,शिक्षक,दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्नेह भोजन देण्यात आले असे उत्कृष्ट नियोजन करून साने गुरुजी निवासी विद्यालया मध्ये संस्थेचे पदाधिकारी एडवोकेट उद्धवराव कराड,राजेश कापसे, प्राचार्य डॉ.कविता गित्ते , विभागप्रमुख सिरसट मॅडम ,सहाय्यक पवार सर व सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांच्या सहकार्याने हा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments