Type Here to Get Search Results !

आदर्श क्रांती न्यूजच्या बातमीचा दणका;चंदन सावरगाव येथील नदी पात्राचे एचपीएम कंपनीने दोन दिवसात केले काम.

 आदर्श क्रांती न्यूजच्या बातमीचा दणका;चंदन सावरगाव येथील नदी पात्राचे एचपीएम कंपनीने दोन दिवसात केले काम.



केज/प्रतिनिधी


मांजरसुंबा-अहमदपूर महामार्गाचे काम व सदर महामार्गावरील पुलाचे काम करत असताना एचपीएम कंपनीने नदी पात्रामध्ये जुने मटेरियल टाकले होते सदर टाकलेले जुने मटेरियल हे एचपीएम कंपनी काढत नसल्यामुळे  आदर्श क्रांती न्यूजने बातमी प्रसिद्ध करताच सदर बातमीची एचपीएम कंपनीने तात्काळ दखल घेऊन नदीपात्राचे दोन दिवसात काम केले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मांजरसुंबा-अहमदपूर या महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपूर्वी काम चालू होते. केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील पुलाचे खोदकाम व रस्त्याचे काम  करत असताना जुने मटेरियल हे एचपीएम कंपनीने नदीपात्रामध्ये टाकले होते.सदर महा मार्गाचे व पुलाचे कामपूर्ण झाल्यावर नदीपात्रात जुने मटेरीयल टाकलेले काढून घेतो असे एचपीएम कंपनीने सदर शेतकऱ्यांना सांगितले होते परंतु सदर कंपनीने दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी सदरचे मटेरियल काढून घेतले नाही त्यामुळे शेतकरी गेले दोन वर्षा पासून सदर प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. सदर मटेरियल मुळे नदी पात्रात  पावसाचे पाणी आले की,ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचेमोठ्या प्रमाणात नुकसान होत होते तरी देखील परंतु एचपीएम कंपनी कसल्याच प्रकारची दखल घेत नव्हती सदर प्रकरणा ची बातमी ही आदर्श क्रांती न्यूज ने प्रकाशित करताच त्या बातमीची एचपीएम कंपनीने तात्काळ दखल घेऊनदोन दिवसांमध्ये पोकलेन मशीन लावून नदीपात्रा तील जुने मटेरियल खोदून काढून नदीपात्र रिकामे केले आहे.यावेळी शेतकऱ्यांनी सदर बातमी प्रकाशित करणाऱ्या तालुका प्रतिनिधी व संपादकाचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments