Type Here to Get Search Results !

घनकचरा व्यवस्थापना बाबत स्वच्छता मित्रांना प्रशिक्षण,बीड,केज, अंबाजोगाई येथील स्वच्छता मिञांचा समावेश .

 घनकचरा व्यवस्थापना बाबत स्वच्छता मित्रांना प्रशिक्षण,बीड,केज, अंबाजोगाई येथील स्वच्छता मिञांचा समावेश .



केज /प्रतिनिधी 


घनकचरा व्यवस्थापन या विषयावर स्वच्छता मित्र यांना धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे ऑफिस व कौटील्य मल्टीक्रिएशन प्रा.लि.व रेनोवेट इंडिया या संस्थेच्या वतीने तसेच यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मित्र नियुक्त करून त्यांना स्वच्छता मित्र प्रशिक्षण देण्यात आले व भारत देशामध्ये शहरी भागात स्वच्छता पर्यावरण चांगले राहून सर्वांना चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ नागरी प्रकल्प २.० हा प्रकल्प महाराष्ट्रासह देशामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

शहरी भागातील प्रत्येक कुटुंबाने कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे वत्यांचे आरोग्य जपावे तसेच ओला स्वयंपाक घरातील ओला कचरा,चहाचा गाळ फळे आणि मांस,अंड्याचे साल बागेतील पाने फुले इ.सुका कचरा प्लास्टिक च्या पिशवीवर डब्बे, कागद,पट्टा,थर्माकोल, धातू,कपडे व चींद्या लेदर रबर,काच ईत्यादी कचरा वेगळा करावा व त्यांचे नियोजन करावे.यासाठी बीड नगरपालिका,केज नगरपंचायत,अंबाजोगाई नगरपालिका यांचा समावेश करण्यातआलेला आहे व या नगरपालिका मध्ये स्वच्छता मित्र यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे.या तालुक्यात शहरी भागात रूट मॅपिंग,डेटा कलेक्शन व घरोघरी भेटी देणे व लोकांना कचऱ्या बद्दल महत्त्व सांगणे व स्वच्छ महाराष्ट्र अभियान शहरी २.०या अभियानाचे जनजागृतीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हा उपक्रम सध्या संपूर्ण भारत देशात व मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात करण्यात येत आहे. या साठी प्रशिक्षक श्रीमती अन्नपूर्णा धोत्रे,सुनिता कोंडाणे व सोबतच संस्थेची (युएलबी)(टीओटी) कॉर्डिनेटर तथा संस्था सचिव बी.वी. कोकाटे यांनी प्रशिक्षण दिले व सोबत धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थासहसचिव प्रेमकुमार कोकाटे,कार्यकर्ते अशोक गायकवाड,प्रकल्प समन्वयक प्रियंका खोब्रागडे,कर्मचारी आरती कोरडे प्रियंका कांबळे, प्रियंका वाघमारे तसेच संस्थेमार्फत या तीनही नगरपालिकेतील स्वच्छता मित्र यांना प्रशिक्षण देण्यात आले व सर्वांनी परिश्रम घेऊन प्रशिक्षण  यशस्वी पूर्ण केले आहे.

Post a Comment

0 Comments