Type Here to Get Search Results !

केज शहरातील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

 केज शहरातील महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.



केज/प्रतिनिधी


केज शहरात एका महिलेला जुन्या भांडणाची कुरापत काढून मारहाण केल्याप्रकरणी एक जणा विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबतची सविस्तर माहिती अशी की,मंगल ज्ञानोबा शेरे वय ४८ वर्षे, रा.कोकीसपीर गल्ली केज  येथील रहिवाशी आहेत. मंगल शेरे व त्यांचे पती ज्ञानोबा शेरे दोघेजण छोटा व्यवसाय करून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवीत आहेत.मंगल शेरे या मागील वीस वर्षापासून केज शहरातील मेन रोड लगत सचिन ईलेक्ट्रॉनिक दुकानासमोर स्टेशनरी सामानाचा हातगाडा  चालवित आहेत.दोन वर्षापूर्वी मालन लक्ष्मण मस्के ही सामान घेण्या साठी आली व तिने मंगल शेरे यांच्या शेजारील फुटाणेवाले हे त्यांच्या दुकानावर नसतानादेखील त्यांनी फुकट फुटाणे घेऊन खाल्ले त्यावरून मालन मस्के व मंगल शेरे यांच्यात किरकोळ भांडण झाली होते.त्यानंतर तिने तिच्या मुलाला घेऊन येऊन मंगल शेरे यांना मारहाण केली होती सदर मारहाणीच्या अनुषंगाने मंगल शेरे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती.त्यानंतर परतमागील आठ दिवसांपूर्वी दिनांक १८ जुलै २०२४ रोजी लक्ष्मण मस्के व त्यांचा मुलगा हनुमंत मस्के यांनी जुन्या भांडणाच्या कारणा वरून मंगल शेरे यांच्या दुकानावर येऊन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यासंबंधी मंगल शेरे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.दिनांक २५ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५-०० वाजण्याच्या सुमारास मंगल शेरे या स्टेशनरी सामानाचा हातगाडा घेऊन केज अंबाजोगाई रोडवर सचिनइलेक्ट्रॉनिक दुकानासमोर असताना त्या ठिकाणी मालन उर्फ कच्ची लक्ष्मण मस्के हिचा मुलगा हनुमंत लक्ष्मण मस्के हा आला व तू माझे वडिलांच्या विरोधात केस पोलीस स्टेशनला तक्रार का दिलीस ? अशी भांडणाची कुरापत काढून त्यांना शिवीगाळ केली व तू लय माजलीस तुझे बघतो असे म्हणून त्यांने त्याच्या हातातील काठीने मंगल शेरे यांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने जोरात मारून त्यांनागंभीर जखमी केले.हनुमंत यांनी पुन्हा त्यांच्या डोक्यात काठी मारली त्यानंतर तो पुन्हा त्यांच्या डोक्यावर काठी मारत असताना त्या त्याचे वार अडवत असताना त्यांनी त्यांच्या खांद्यावर,पाठीत,सीटवर ,पायावर,बरगडीवर मारून दुखापत केली त्यामुळे मंगल शेरे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सचिन इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या समोर खाली पडल्या डोक्यातून रक्त निघत असल्यामुळे व हनुमंत मस्के यांनी केलेली मारहाणीमुळे त्या बेशुद्ध झाल्या तेथील लोकांनी त्यांना सरकारी दवाखाना केज येथे नेऊन दाखल केले तेव्हा मंगल शेरे या शुद्धीवर आल्यात तेव्हा त्यांचे पती ज्ञानोबा शेरे, पुतण्या रामेश्वर भोसले, गजानन वाघमारे असे तेथे होते.मंगल शेरे यांना त्यांच्या नातेवाईकांनी काय झाले ?असे विचारले असता मंगल शेरे यांनी सदर घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. 

उपचार घेऊन आल्या नंतर केज पोलीसठाण्यात गु.र.नं.४१६/२०२४कलम भारतीय न्याय संहिता (बी एनएस)२०२३,१०९,११८ (१),३५२,३५१(२),३५१ (३) प्रमाणे हनुमंत लक्ष्मण मस्के याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments