Type Here to Get Search Results !

केज येथील शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाज बांधवांची बैठक संपन्न मा.आ. पृथ्वीराज साठे यांना विधानसभेसाठी पुर्ण ताकतीनीशी ‌पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय!

 केज येथील शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाज बांधवांची बैठक संपन्न



 मा.आ. पृथ्वीराज साठे यांना विधानसभेसाठी पुर्ण ताकतीनीशी ‌पाठिंबा देण्याचा एकमुखी निर्णय!





केज/प्रतिनिधी



केज येथील शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाज बांधवांची बैठक काल संपन्न झाली  या बैठकीमध्ये केज विधानसभेसाठी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देण्याचा सकल मातंग समाज बांधवांकडून एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे. 


         याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सध्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केज मतदार संघामध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते हे केज विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तर अनेक जण ग्रामीण भागातील गावात जाऊन कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधत आहेत. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार  पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे हे देखील केज विधानसभा लढवण्याच्या तयारीला असुन त्यांना केज मतदार संघात व केज शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 

याच पाश्र्वभूमीवर दिनांक २९ जुलै २०२४ रोजी केज शहरातील शासकीय विश्रामगृहात केज मतदारसंघातील व केज शहरासह तालुक्यातील सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

सदर बैठक ही रघुनाथ कुचेकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार पृथ्वीराज साठे, बळीराम जोगदंड यांच्या उपस्थितीत पार पडली. 

या बैठकीमध्ये सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने चर्चा करून सर्वांनमुत्ते ठरवण्यात आले की, येणाऱ्या केज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरचंद्र पवार या पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मातंग समाज बांधवांनी तन मन धन लावून त्यांना साथ देऊन त्यांच्या सोबत राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. 

यावेळी नांदूघाट व नेकनूर सर्कलचे ज्येष्ठ नेते अशोकराव सोनवणे, अशोकराव जाधव, विडा सर्कलचे प्रताप मोरे, ज्येष्ठ नेते बाबुराव गालफाडे, प्रा. रमेश पाटोळे, सचिन गालफाडे, गणेश कांबळे,तानाजी दुनघव, विठ्ठल वैरागे,श्रीकांत कांबळे,अनिल जोगदंड,विलास वैरागे,रणजीत वैरागे,बाळासाहेब खाडे,सावता खाडे यांच्यासह  समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments