Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे केज शहरात जंगी स्वागत दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या स्टिकरचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले अनावरण शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूने का? विरोधात ती भूमिका स्पष्ट करावी-प्रकाश आंबेडकर



 वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचे केज शहरात जंगी स्वागत


दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या स्टिकरचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले अनावरण 


शरद पवार मराठा आरक्षणाच्या  बाजूने का? विरोधात ती भूमिका स्पष्ट करावी-प्रकाश आंबेडकर


केज / प्रतिनिधी



वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर  यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे केज शहरात  जंगी स्वागत करण्यात आले आहे.दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या स्टिकरचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी  अनावरण  करून पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.  दिनांक ३० जुलै २०४ रोजी सकाळपासून सुरू झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये लातूर,आंबेजोगाई  केज येथे आरक्षण बचाव विषयी मार्गदर्शन केले यावेळी  ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी नेत्यांच्या नरड्यात काय?अडकले असा सवाल आलेल्या समाज बांधवांना विचारला असता यावेळी सरकारमधील नेत्यांची फार मोठी गोची झाल्याचे सांगितले.तसेच यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत का? विरोधात ती भूमिका स्पष्ट करावी असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट बोलून दाखवले आहे. 

राज्यांमध्ये सलोखा राखायचा असेल तर शरद पवारांनी योग्य भूमिका बजवावी असेही शरद पवार यांना त्यांनी आवाहन केले आहे. पुढे बोलताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की,  आम्ही गरीब मराठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत गरीब मराठ्यांनी आम्हाला साथ द्यावी आमचे सरकार आल्यावर त्यांना आम्ही योग्य असा न्याय देऊ असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. यावेळी केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के ,जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे, अमोल हजारे, शरद धिवार, सय्यद रज्जाक ,प्रवीण मस्के ,भारत गायकवाड, नितीन बचुटे व केज तालुक्यातील बहुजन वंचित आघाडीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी बचाव आरक्षणासाठी आलेले ओबीसी कार्यकर्ते व ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments