Type Here to Get Search Results !

केज नगरपंचायतच्या निष्काळजीमुळे घराची भिंत पडून नुकसान, तात्काळ पंचनामा करून मदत देण्यात यावी. राजाभाऊ डुकरे यांची मागणी.

 केज नगरपंचायतच्या निष्काळजीमुळे घराची भिंत पडून नुकसान, तात्काळ पंचनामा करून मदत देण्यात यावी. राजाभाऊ डुकरे यांची मागणी.



केज/प्रतिनिधी


केज नगरपंचायतच्या निष्काळजीमुळे घराचे भिंत पडून नुकसान झाले असून तात्काळ पंचनामा करून मदत देण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना राजाभाऊ डुकरे यांनी दिले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की,राजाभाऊ भागवत डुकरे रा.केज यांचे नगर  पंचायतच्या हद्दीमध्ये घर आहे ज्याचा मिळकत क्रमांक१००५ आहे त्यांचे घर हे वार्ड क्रमांक १३ मध्ये आहे.त्यांच्या घरा लगत जुना पांदण रस्ता आहे सदर रस्ता हा मंगळवार पेठ मार्गे सोनी जवळा जाणारा जुना रस्ता आहे या रस्त्यालगत त्यांचे घर असून त्यांच्या या राहत्या घरात नालीचे पाणी वाहत आहे.सदर नाली नादुरुस्त असल्या मुळे सदर वाहणारे पाणी हे त्यांच्या घराच्या भिंती मध्ये मुरून घराची भिंत पडली आहे तसेच सदर पाणी हे गेल्या अनेक वर्षा पासून त्या ठिकाणी मुरत आहे त्यामुळे त्यांच्या घराला तडे गेले आहेत. सदर पाण्याचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास त्यांचे संपूर्ण घर पडू शकते.सदर प्रकरणी राजाभाऊ डुकरे  हे गेल्या एक वर्षापासून केज नगरपंचायत कार्यालयास वेळोवेळी लेखी तक्रार अर्ज केले व अनेक वेळा संबंधित कर्मचारी यांना प्रत्यक्षात भेटून पाठपुरावा केला आहे परंतु सतत केज नगरपंचायत कडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.सदर पाण्याचा लवकर बंदोबस्त न झाल्यास राजाभाऊ डुकरे यांच्या घरास व त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे असे त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.राजाभाऊ डुकरे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हणाले की,सदर पाण्याचा तात्काळ बंदोबस्त करून माझ्या पडलेल्या घराचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी दिलेल्या लेखी निवेदनात केली आहे.सदर निवेदना च्या प्रति तहसीलदार केज,नगराध्यक्षा,नगर पंचायत केज, मुख्याधिकारी नगर पंचायत केज यांना दिल्या आहेत.

सदर निवेदन हे माझ्या मोबाईल व्हाट्सअप वर मला मिळाले असून मी बाहेरगावी असल्यामुळे सदर निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे सांगितले आहेत व मी स्वतः जाऊन घराची पाहणी करणार आहे. 

नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड.

Post a Comment

0 Comments