Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आवसगाव या ठिकाणी मोफत वह्या व रजिस्टरचे वाटप.

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आवसगाव या ठिकाणी मोफत वह्या व रजिस्टरचे वाटप.



केज /प्रतिनिधी 


दिनांक २६ जुलै २०२४ रोजी पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक श्री. संतोष शिनगारे तसेच हिंदुस्तान फिडस बारामती यांचे प्रतिनिधी शिवाजी देवकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व रजिस्टर यांचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना संतोष यांनी मुलांनी शिक्षणासॊबतच शेती,माती,पाणी याचा अभ्यास करून आपल्या आई-वडीलांना शेती कामात मदत करावी असे ही आवाहन केले. आवसगावच्या मातीत खूप चांगला गुणधर्म आहे या शाळेत शिकून कलेक्टर,डॉक्टर, इंजिनियर,व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, चांगले शेतकरी असे अनेक हिरे या जिल्हा परिषद शाळेने घडवले आहेत.चांगल्या शिक्षणा सोबतच विद्यार्थ्यांनी पडलेले सर्व प्रश्न शिक्षकांना विचारून त्याचे उत्तर घेतले पाहिजे असे ही बोलताना ते म्हणाले.

शिवाजी देवकर यांनी हिंदुस्थान फिड्स कंपनी बद्दल माहिती देऊन कंपनीच्या कामाबद्दल माहिती दिली व जास्तीत जास्त दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे जनावराचे खाद्य फीड वापरून दूध वाढवावे असे सांगितले.यावेळी १८७ विद्यार्थ्यांना १००० वह्या व रजिस्टरचे मोफत वाटप कंपनी मार्फत करण्यात येत आहे असे ही त्यांनी सांगितले.यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.गव्हाणे सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.हंडीबाग सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments