Type Here to Get Search Results !

केज विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले विजयकुमार वाव्हळ.

 केज विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले विजयकुमार वाव्हळ.



केज/प्रतिनिधी


लोकसभेची निवडणूक नुकतेच पार पडली असून आता विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.केज मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव असल्यामुळे केज मतदार संघामध्ये अनेक इच्छुक  उमेदवार आहेत सध्या इच्छुक उमेदवार हे केज विधानसभा लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामध्ये विजयकुमार वाव्हळ हे देखील इच्छुक असून तेही केज मतदार संघातील ग्रामीण भागात जाऊन नागरिकाशी संवाद साधू लागले आहेत.या बाबत खात्रीलायक सूत्रा कडून मिळालेली माहिती अशी की,किल्ले धारूर तालुक्यातील आसोला येथील भूमिपुत्र सध्या गेवराई येथे राहणारे उद्योजक तथा संपादक विजयकुमार वाव्हळ हे केज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी पुणे, मुंबई येथे जाऊन एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेऊन केज विधान सभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करून पक्षाकडून तिकीट मागितले आहे.मुंबई येथे एका पक्ष्यांच्या नेत्यांना भेटल्यानंतर विजयकुमार वाव्हळ यांनी केज मतदार संघातील काही गावांमध्ये गावभेटी घेऊन संपर्कदौरा चालू केला आहे.केज मतदार संघामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्यांचे नातेवाईक देखील या मतदार संघांमध्ये आहेत अशी चर्चा सध्या नागरिकांतून ऐकण्यास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments