Type Here to Get Search Results !

श्री दत्त संस्थान टाकळी येथे दत्तात्रय मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

 श्री दत्त संस्थान टाकळी येथे दत्तात्रय मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा. 


                                          


केज /प्रतिनिधी 


दि.२१जुलै २०२४ रविवार रोजी केज तालुक्यातील टाकळी येथील श्री दत्त संस्थान दत्तात्रय मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.सुखानंद निवासी वैकुंठवासी श्री ह.भ.प.सद्गुरु गोपिचंद बाबा भारती यांचा मुलगा श्री.ह.भ.प.अविनाश महाराज भारती यांनी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम आयोजित केला व याचा लाभ सर्व भाविक भक्तांना मिळाला.या कार्यक्रमानिमित्त श्री. ह.भ.प.लक्ष्मण पांडुरंग इनामदार गुरुजी यांनी किर्तन सेवा केली.श्रीगुरु सारिखाअसतापाठीराखा। इतरांचा लेखा कोण करी ।। या अभंगाचे विवेचन केले.श्रीगुरु पाठीराखा असल्यास काहीही कमी पडत नाही.असे या किर्तनात सांगितले.श्री दत्तात्रय व श्री.ह.भ.प. वै.सद्गुरु गोपिचंद बाबा भारती यांच्या समाधीचे पुजन करण्यात आले.या कार्यक्रमास भीमराव लहाने मामा,सौ.लहाने ताई,उमाशंकर शिंदे, तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम हे त्यांच्या परिवारातील विजय कदम,सौ.वत्सला बाई कदम,सौ.प्रतिभा कदम,अक्षय कदम,सौ. सुप्रिया कदम हे उपस्थित होते तसेच गंगाराम नखाते असे अनेक भक्त सहभागी झाले होते.शेवटी महाप्रसादाने कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments