Type Here to Get Search Results !

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.

 स्वानंद सार्वजनिक वाचनालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी.



केज / प्रतिनिधी


स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगाव ता. केज.जि.बीड.येथे दिनांक २३ जुलै २०२४ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी व्याख्यान, परिसंवाद,चर्चासत्रइत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,माजी प्राचार्य,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.त्यानंतर संजय सोनवणे यांचे व्याख्यान घेण्यात आले.त्यानंतर परिसंवाद घेण्यात आला. यावेळी ह.भ.प.नारायण भाऊ गायकवाड,बबनराव पुंड,रावसाहेब जाधव, माजी सरपंच रामराजे गायकवाड यांनी परि संवादात सहभाग घेऊन मार्गदर्शन केले.त्यानंतर चर्चासत्र घेण्यात आले.या चर्चासत्रात रमेशराव गायकवाड,आनंद भैय्या गायकवाड,राहुल कदम, सुरेंद्र कदम,अमोल सौदागर,बाबासाहेब शिंदे, बाळासाहेब गायकवाड, गोविंद भोगजकर यांनी सहभाग घेवून मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोप वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग,घेतलेले कष्ट, केलेला त्याग,भोगलेला तुरुंगवास इतरही बाबींवर वैचारीक प्रकाश टाकला व बाळ गंगाधरटिळकांच्या कार्य व विचाराला उजाळा दिला.

Post a Comment

0 Comments