Type Here to Get Search Results !

श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

 श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी


.

 

केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त आले होते.त्याचबरोबर पंचक्रोशीतील भक्त दर्शनासाठी आले होते.

श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थांनचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे यावेळीकीर्तन संपन्न झाले.किर्तन सेवेत बोलताना ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री म्हणाले की,आयुष्यामध्ये जर योग्य ठिकाणी जायचे असेल,यश संपादन करायचे असेल आणि चांगले जीवन जगायचे असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही.प्रत्येक क्षेत्रा मध्ये यश संपादन करण्या साठी गुरुचे मार्गदर्शन आवश्यक असते.म्हणून गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे.जो भक्त गुरुची सेवा करतो गुरुचे नामस्मरण करतो त्याचे कल्याण होते असे ते म्हणाले.गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या भाविकांच्या महाप्रसादाची सोय लोमटे यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शना खाली अशोक महाराज, अमोल महाराज,जनार्दन महाराज चलवाड,पारेकर बप्पा,गणपत पांचाळ, तुकाराम कापसे आणि सर्व पंचक्रोशीतील स्वयं सेवकांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments