Type Here to Get Search Results !

मल्टीस्टेट संस्थानी हडपलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागणार. - ठेवीदार किरण आस्वले.

 मल्टीस्टेट संस्थानी हडपलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी आंदोलन     करावे लागणार. - ठेवीदार  किरण आस्वले.



केज/प्रतिनिधी 


केज शहरातीलराजस्थानी मल्टीस्टेट,ज्ञानराधा मल्टीस्टेट,साईराम मल्टीस्टेट या संस्था गेल्या वर्षभरापासून बंद पडलेल्या आहेत.तरी केज शहरातील खातेदार व ठेवीदार हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत नुसते फेसबुक व युट्युब वर त्यांची माहिती घेत आहेत व एकमेकांत चर्चा करत आहेत केवळ हा प्रश्न चर्चा करून अगर नुसतीच केस दाखल करून प्रश्नसुटणार नाही.कारण केस दाखल करून त्यावर काही झालेले दिसत नाही आज केस दाखल करून एक महिना उलटला तरी साईराम मल्टीस्टेटचा परभणे व त्याच्यासंचालक मंडळांना अजूनही अटक झालेली नाही घरात बसून मोबाईल पाहून कुणालाही पैसे मिळणार नाहीत. त्यासाठी खातेदारांचा व ठेवीदारांचा रास्ता रोको किंवा मोर्चा तहसील कार्यालयावर होणे गरजेचे आहे.या मल्टीस्टेट मध्ये गोरगरीब,कष्टकरी,शेत मजूर,भांडी घासणारे, पेन्शनधारक, नोकरदार यांच्याही काही ठेवी व खात्यावर आपल्या कष्टाच्या ठेवी ठेवलेल्या आहेत काही वयोवृद्ध माणसांनी दोन लाख पाच लाख अशा ठेवी ठेवलेल्या आहेत.महिन्याला दोन हजार पाच हजार रुपये मिळतात त्यावर आपली उपजीविका महिनाभर भागवावी या उद्देशाने या मल्टीस्टेटमध्ये पैसे टाकले कर्मचारी व मॅनेजर कडुन जास्त व्याजाचे आमिष दाखविण्यात आले.आज त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.शेतकरी व शेतमजूर यांनी आपल्या शेतीच्या कामासाठी व मुलीच्या लग्नासाठी शिक्षणासाठी पैसे ठेवले आहेत परंतु आज शेतीचे काम चालू असताना देखील त्यांना ते पैसे मिळत नाहीत. नौकरदारांनी मोठी स्वप्न पहात मुलांच्या शिक्षणा साठी घर बांधण्यासाठी दहा लाखापासून पंधरा लाखापर्यंत ठेवी ठेवण्यात आल्या आहेत.या मल्टीस्टेट वाल्यांकडुन लोकांना सांगण्यात येत होते की,तुम्ही कधीही पैसे मागा कुठेही मागा आम्ही तुमचा पैसा त्या ठिकाणी आणून देऊ आणि तेदेतही होते यामुळे लोकांचा विश्वास बसत गेला आम्ही तर इतर बँकेपेक्षा ज्यादा व्याजदर सुद्धा तुम्हाला देऊ असे आमिष दाखविण्यात आले होते. कुणाच्या खिशात जरपैसा दिसला तर ते कर्मचारी व मॅनेजर त्याच्या घरीजाऊन पैसा आमच्या बँकेत ठेवा असे असे सांगून पैसाजमा केला व लोकांचा विश्वास संपादन केला आणि या जाळ्यात लोक फसली गेली आणि आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशावर डल्ला मारून बँक बंद केल्या गेल्या कारण होते तिरूमला ऑइलवर धाड पडली गेली का टाकण्यात आली हा प्रश्नच आहे परंतु लोकांची मात्र तारांबळ उडाली लोक पैसेकाढण्या साठी बँकेत गर्दी करू लागले आणि अचानक बँक बंद झाली ज्ञानराधा बंद झाल्यामुळे इतरही बँकेवर त्यांचा परिणाम होऊ लागला आणि त्याही बंद पडल्या त्यामध्ये साईराम,राजस्थानी, जिजाऊ अशा मल्टीस्टेट  बंद पडल्या आणि लाखो ठेवीदार अडचणीत आले त्यांचे संसार उघड्यावर आले सुरेश कुटे यांनी त्याच वेळेस दिल्लीला जाऊन भाजप प्रवेश करण्यात आला लोकांना आशा वाटत गेली परंतु घडले वेगळेच बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपात प्रवेश झाला दिल्लीवरूनच कुटे यांनी फेसबुकद्वारेलोकांना घाबरू नका असे आश्वासन दिले व वेळोवेळी फेसबुक द्वारे आश्वासने देण्यात आली परंतु ती निष्पभ ठरली. शासनाला सुद्धा त्यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आम्ही जनतेचा एक ना एक रुपया देणार आहोत अशा आशयाचे पत्र सुद्धा पोलीस व जिल्हाधिकारी यांना देण्यात आली परंतु त्याही ठिकाणी चक्क शासनाचीच फसवणूक केली गेली लोकांचा पैसा मिळेना लोक आंदोलने मोर्चे उपोषण करू लागली परंतु त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला परंतु यावर सत्ताधारी यांनी केवळ टोलवाटोलवी केलेली दिसते हाप्रश्न राज्यशासना अंतर्गत येत नाही असे म्हणून सोडून दिले आज लोकांचे संसार उड्यावर आलेले आहेत तरी सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे लोकांना थोडेच माहिती असते की, ही बँक आहेकी मल्टीस्टेट आहे त्याची परवानगी दिल्लीवरून असते परंतु जर एखाद्या दुकानांमध्ये स्वस्त मिळत असेल आपला फायदा होत असेल तर त्या ठिकाणी लोक जाणारच परंतु त्या दुकानाला परवानगी असते कोणतेही दुकान असो धंदा असो त्याची परवानगी घ्यावीच लागते आणि त्याची जबाबदारी त्या ठिकाणच्या प्रशासना ची असते समजा गांजा पिकवायला परवानगी असते का दारू विकायला परवानगी असते का गुटखा विकायला परवानगी असते का ? आणि तसे जर दिसले तर त्यावर लगेच कार्यवाही होते मग ह्या मल्टीस्टेट परवानगी दिली तर जबाबदारी सरकारलाच म्हणजे ज्याने परवानगी दिली त्यांना घ्यावीच लागणार आहे आणि या लोकांचा पैसा द्यावाच लागणार आहे आज केज शहरात बीड लोकसभेचे खासदार यांचे वास्तव्य आहे त्यांनी मी निवडून आल्यावर सर्वांचे पैसे मिळवून देण्यासाठीप्रयत्न करतो असे म्हणाले होते मग त्याचे काय झाले ? हे अद्याप पर्यंत तरी कुठे दिसत नाहीत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांचेही लक्ष याकडे दिसत नाही केज विधानसभेचे आमदार व इतर तालुक्यातील आमदार यांचेही लक्ष दिसत नाही तसे जालना जिल्ह्यातील आमदार राजेश टोपे यांनी जसा मोर्चा काढला हजारोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितले मी या जिल्ह्याचा लोक प्रतिनिधी आहे त्यामुळे लोकांचा प्रश्न मांडणे त्यांच्या समस्या सोडविणे ही माझे कर्तव्य आहे तसे पाहिले तर ह्या मल्टीस्टेट वाल्यांचे मूळ बीड जिल्ह्यातील आहे आणि मग हा प्रश्न खरा तर या जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी मांडला गेला पाहिजे पण ते तसेहोताना दिसत नाहीत कुणाचे याकडे लक्ष नाही ते सगळे राजकारणात व्यस्त दिसत आहेत त्यांना का दिसत नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे हा प्रश्नकसा सुटेल हा येणारा काळच ठरवेल यामुळे या माध्यमा तून मी एकच विनंतीकरतो मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन कोण खात्याचा प्रमुख आहे यात गुपित काय लपले आहे याची चौकशी व्हावी नसता तिव्र आंदोलन उभारावे लागेल असा ईशारा ठेवीदार अस्वले किरण शंकर यांनी  दिला आहे.ते या तीनही मल्टीस्टेटचे खातेदार व ठेवीदार आहेत.

Post a Comment

0 Comments