Type Here to Get Search Results !

केज विधानसभेसाठी रमेश तात्या गालफाडे यांची मोर्चेबांधणी केज शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात मंगळवारी होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याची होतेय जोरदार पूर्वतयारी.

 केज विधानसभेसाठी रमेश तात्या गालफाडे यांची मोर्चेबांधणी 


केज शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात मंगळवारी  होणाऱ्या जनसंवाद मेळाव्याची होतेय जोरदार पूर्वतयारी.



केज/प्रतिनिधी


केज विधानसभेसाठी रमेश तात्या गालफाडे यांची ग्रामीण भागातील गावागावात जाऊन शेतकरी,नागरिक व युवकाच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडी अडचणी जाणून घेवु त्यांच्याशी सुसंवाद साधत जोरदार मोर्चेबांधणी चालू केली आहे.केजशहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात मंगळवारी होणाऱ्या जन संवाद मेळाव्याची जोरदार पूर्वतयारी चालू आहे.येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणारअसल्याचे  संकेत मिळत असल्याने सर्वच पक्षाचे उमेदवार तयारीला लागलेले दिसत आहे.रमेशतात्या गालफाडे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवावी असा जनसामान्य नागरिकांनी व युवकांनी आग्रह धरला आहे.रमेशतात्या गालफाडे यांना केज मतदार संघात मानणारा नागरिक,युवक वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांचा जनसंपर्क ही चांगला आहे.त्यामुळे त्यांनी केज मतदार संघा मध्ये जनसंपर्क वाढविण्या साठी मोर्चेबांधणी सुरू करून गावपातळीवर भेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे.व सर्व सामान्य जनतेशी सुसंवाद साधत आहे.यामुळे जनते कडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.येत्या ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने त्याच पार्श्वभूमी वर रमेश गालफाडे यांनी जनसंपर्क वाढवला आहे. गालफाडे यांनी मतदार संघात गावभेटीवर जोर लावला आहे.केज विधान सभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी रमेश गालफाडे यांनी पूर्णताकद लावली असल्याचेसमजले आहे.मुंबई,पुणे येथील कांही मोठ्या राजकीय नेत्यांची भेटी घेऊन केज विधानसभा संदर्भात चर्चा केल्याची देखील केज विधानसभा मतदारसंघात जोरदार चर्चा चालु आहे. 

रमेश गालफाडे गेल्या अनेक दिवसांपासून केज- अंबाजोगाई विधानसभा मतदार संघात मतदार बांधवाच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत.

रमेश गालफाडे यांनी मतदारसंघातील जनते साठी "जनसंवाद मेळावा' दि.३० जुलै २०२४ रोजी  मुक्ताई फंक्शन हॉल, भवानी चौक केज येथे ठेवण्यात आला आहे.या जनसंवाद मेळाव्याची पूर्वतयारी जय्यत चालू आहे.या जनसंवाद मेळाव्यासाठी केजमतदार संघातील शेतकरी, युवक, नागरिक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रमेश गालफाडे यांनी दिली आहे. या जन संवाद मेळाव्यासाठी मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायिका राधाताई खुडे "सुर नवा ध्यास नवा" उपविजेत्या या उपस्थीत रहाणार आहेत.जनसंवाद मेळाव्या मध्ये नागरिक,युवक, शेतकरी,विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पुढील दिशा ठरवणार आहे असे  आमच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments