Type Here to Get Search Results !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला केज मधुन शिवसेना उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते प्रारंभ.

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला केज मधुन शिवसेना उपनेत्या प्रा.सुषमाताई अंधारे यांच्या हस्ते  प्रारंभ.



केज/प्रतिनिधी


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे,युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सुनीलजी प्रभु, मराठवाडा समन्वयक उपनेते विश्वनाथनेरूरकर, शिवसेना संपर्कप्रमुख बीड परशुराम जाधव, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे,बीडलोकसभा प्रमुख सुनिल धांडे यांच्या उपस्थितीत व शिवसेना बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या आयोजनात दिनांक ३० जुलै २०२४ रोजी शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय केज येथे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला प्रारंभ करण्यात आला.या सदस्य नोंदणीअभियानात शिवसेना उपनेत्या सुषमा ताई अंधारे यांनी प्रथम सदस्यत्व नोंदवून अभियानाला सुरुवात केली,पदाधिकार्यांना व शिवसैनिकांना या सदस्य नोंदणी अभियानाविषयी मार्गदर्शन केले.यावेळी बीड शिवसेनाजिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांनी केज विधानसभा व परळी विधानसभा मतदार संघातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी कराव्यात अशा सुचना केल्या. यावेळी शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे,बीड लोकसभाप्रमुख सुनिल धांडे,बीड शिवसेना जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे,केज विधानसभा नेत्या डॉ. नयनाताई सिरसट (पाटील )उपजिल्हाप्रमुख दिपक मोराळे,उपजिल्हा प्रमुख शिवाजी कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते,तालुकाप्रमुख केज अशोक जाधव, अंबाजोगाई तालुकाप्रमुख बालासाहेब शेप,परळी तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल,अंबाजोगाई शहरप्रमुख अशोक हेडे, केज शहरप्रमुख तात्या  रोडे,किशोर घूले सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments