Type Here to Get Search Results !

केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाला मोठा दिलासा, विनापरवाना बांधकाम केल्या प्रकरणाचा माजी नगरसेवक कपिल मस्के यांचा अर्ज नामंजूर.

 केजच्या नगराध्यक्षा सौ.  सिताताई बनसोड यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाला मोठा दिलासा,

विनापरवाना बांधकाम केल्या प्रकरणाचा माजी नगरसेवक कपिल मस्के यांचा अर्ज नामंजूर.



केज/प्रतिनिधी


केजच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोडे यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाला दिलासा असून विनापरवाना बांधकाम केल्या प्रकरणाचा माजी नगरसेवक कपिल मस्के यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई प्रदीप बनसोड या संवैधानिक पदावर म्हणजेच नगराध्यक्षा पदा वर राहून त्यांनी केज शहरातील महात्मा फुले नगर येथील त्यांच्या मालकीचे घर नं.३१३१ या घराचा बांधकाम परवाना न घेताच सौ. सीताताई बनसोड या बांधकाम करीतआहेत.सौ.सिताताई प्रदीप बनसोडे यांना अनधिकृत बांधकाम केल्यामुळे महाराष्ट्र नगर परिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम१९६५ चे कलम ४४,४४(ई) नुसार अपात्र घोषित करण्यात यावे.या आशयाची अपीलीय तक्रार माजी नगरसेवक कपिल मस्के यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागील दीड वर्षांपूर्वी केली होती.सदर प्रकरणी दिनांक २५एप्रिल २०२३ पासून ते दिनांक १६ जुलै २०२४ पर्यंत नऊ वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावण्या घेतल्या आहेत.सदर प्रकरणी अर्जदार व गैर अर्जदार यांच्या वकिलांनी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करून आपापले बाजू मांडली होती.दिनांक १६ जुलै २०२४ रोजी अंतिम सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर निकाल हा राखून ठेवला होता.दिनांक २५ जुलै २०२४ जिल्हाधिकारी श्री. अविनाश पाठक यांनी सदर प्रकरणी निकाल देत अर्जदार माजी नगरसेवक कपिल मस्के यांचा केज च्या नगराध्यक्षा सौ. सीताताई प्रदीप बनसोड  यांना अपात्र ठरविण्या साठी अपिलीय अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.सदर प्रकरणी नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सदर प्रकरणीअर्जदाराच्या वतीने ॲड.के.एस.पंडित बीड,ॲड.सचिन थोरात, केज यांनी बाजू मांडली तर गैरअर्जदारांच्या वतीने ॲड.बी.बी.गोस्वामी,बीड यांनी बाजू मांडली आहे. 

हा सत्य असत्याचा विजय असून न्यायदेवतेने सत्याच्या बाजूने निकाल दिला आहे त्यामुळे हा सत्याचा विजय आहे.मला अपात्र करण्यासाठी विरोधकांनी केलेल्या टोकाच्या प्रयत्नांना मा. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयातून चांगलीचपराक बसलेली आहे.मी कसल्याच प्रकारे माझ्या पदाचा दुरुपयोग केला नव्हता व न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता म्हणून न्यायदेवतेने योग्य असा निकाल दिला आहे. 

नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड.

Post a Comment

0 Comments