Type Here to Get Search Results !

केज ते कानडीमाळी रस्त्याचे धीम्या गतीने काम होत असल्याने प्रवाशांचे बेहाल,रस्त्याचे काम तात्काळ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी.

 केज ते कानडीमाळी रस्त्याचे धीम्या गतीने काम होत असल्याने प्रवाशांचे बेहाल,रस्त्याचे काम तात्काळ करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी.



केज/प्रतिनिधी


केज ते कानडीमाळी रस्त्याचे काम सुरु असून हे काम अत्यंत धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याने लोकांना रहदारीसाठी नाहक त्रास होत आहे.त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तअसे की,केज ते कानडीमाळी  रस्त्याच्या कामासाठीरस्ता खोदल्यामुळे नालीतील पाण्यामुळे व पावसामुळे रस्त्यावर पूर्णपणे चिखल झाल्याने रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.लहान वाहनधारक घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे.तसेच ये-जा करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या रस्त्याची एक बाजू प्रवासासाठी खुली करावी अन्यथा खा.बजरंग बप्पा सोनवणे  व मा.आ.पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे.तहसीलदार श्री. सचीन देशपांडे यांनी हे निवेदन स्विकारले आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक तालुकाध्यक्ष कैलास चाळक,शहराध्यक्ष इमाद फारोकी,विधीज्ञ विष्णू पाटील,दीपक राऊत,ऋषीकेश जाधव, मेटे सुरेश,यश काळे, मोहम्मद हरणमारे आदीं च्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments