Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी



केज/प्रतिनिधी 



जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज या शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजाभाऊ कदम यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करुन अभिवादन केले.लोकमान्य टिळक यांचा जन्म दि.२३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला व क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म दि.२३ जुलै १९०६ रोजी भावरा-अलिराजपूर येथे झाला.लोकमान्य टिळक यांनी भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्या साठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.त्यांनी मराठा दर्पण, केसरी ही दैनिके सुरू केली.ते जहाल मतवादी विचाराचे होते."स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच" हा त्यांनी नारा दिला.अशा प्रकारे लोकमान्य टिळक यांनी भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अतिशय कष्ट घेतले.चंद्रशेखर आझाद यांनी राम प्रसाद बिस्मिलच्या मृत्युनंतर हिंदुस्थान सोशालिस्ट असोसिएशन (H.R.H.) या क्रांतिकारी संघटनेची "हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (H.S.R.A.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचे प्रमुख होते. त्यांनी भारत देश स्वतंत्र करण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून क्रांतिकारी कार्य केले असे आपल्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शाळेतील शिक्षक वृंद श्री. बापुसाहेब गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली तसेच श्री.भारत हांगे, श्रीमती सोनाली भुमकर,श्रीमती गिताताई अंडील,श्री.बाळासाहेब राठोड यांनीही सखोल माहिती दिली.या कार्यक्रमास शिक्षक श्री. बाबासाहेब मैंद,पी.एम.पोषण शक्ती कामगार संगिता माने,राधा आक्का खामकर,सेवानिवृत्त शिक्षक श्री.परमेश्वर खामकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.बाळासाहेब राठोड यांनी केले व श्रीमती सोनाली भुमकर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments