Type Here to Get Search Results !

सर्व सामान्यांना भेटला वाली खा.बजरंग सोनवणे यांच्या जनता दरबारातून खणखणले अधिकाऱ्यांचे फोन पवनसुत निवास स्थानी भरवला जनता दरबार,सर्वाधिक तक्रारी महावितरण विभागाच्या

 सर्व सामान्यांना भेटला वाली खा.बजरंग सोनवणे यांच्या जनता दरबारातून खणखणले अधिकाऱ्यांचे फोन


पवनसुत निवास स्थानी भरवला जनता दरबार,सर्वाधिक तक्रारी महावितरण विभागाच्या



केज/प्रतिनिधी


अनेक शासकीय कार्यालयात चकरा मारूनही काम होत नाही. ज्यांची कोणी दखलही घेत नाही अशा गरजवंतांना खा.बजरंग सोनवणेंच्या रूपाने वाली भेटला आहे.रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी खा. बजरंग सोनवणे यांनी पवनसुत निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते.पहिल्याचजनता दरबारात नागरिकांच्या रांगा लागल्या.यावेळी अडलेली आणि राजकीय द्वेषातून अडवलेली कामे मार्गी लावण्यासाठीजनता दरबारातून अधिकाऱ्यांचे फोन खणखणले.खा. बजरंग सोनवणे यांनी निवडून आल्यानंतर प्रशासकीय पातळीवर मॅरेथॉन बैठका घेवून प्रलंबित कामांचा आढावा घेतला.रेल्वेसारख्या महत्वाच्या प्रश्नावर शपथ घेण्या आधी बैठक घेवून या प्रकल्पाची काय स्थिती आहे,हे जाणून घेतले.या नंतर त्यांनी दिल्लीत जाऊन शपथ घेतली. दरम्यान,आता दिल्लीतून परतल्यानंतर बीड जिल्ह्या तील विविध तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जातआहे.शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आटोपून ते रात्री उशीरा केजमध्ये पोहचले. यानंतर त्यांनी सुर्योदय होण्याच्या वेळीच आज जनता दरबार असल्याचे केजमध्ये कळविले. सकाळी ९ -०० वाजता जनता दरबाराला सुरूवात झाली.तर सायंकाळी ४-३० पर्यंत हा जनता दरबार सुरू होता.यावेळी नागरिकांनी आपले प्रश्न घेवून अक्षरश: रांगलावली होती.यात महावितरण कडून अडवणूक होत असल्याचे गाऱ्हाणे सर्वाधिक नागरिकांचे होते.त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि शाळांसाठीयेणाऱ्या अडचणीही नागरिकांनी मांडल्या.खा.बजरंग सोनवणे यांनी प्रश्न घेवून आलेल्या नागरिकांचे जागीच समाधान करण्याचा प्रयत्न केला. रविवारची सुट्टी असताना ही संबधित अधिकाऱ्यांना फोन लावून दोन दिवसात कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.शिवाय आलेल्या सर्वांचे निवेदने स्विकारून संबधित अधिकाऱ्यांना हे निवेदन कार्यवाहीस्तव पाठविण्या ची व्यवस्थाही केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,उपअभियंता महा वितरण धारूर,कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग आष्टी विभाग दोन या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली.

पवनसुत निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते.यादरम्यान, शेकडो नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.कित्येकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविले.हा जनता दरबार कायम सुरू राहील.तसेच  लोकांच्या सेवेत चोवीस तास काम करण्याचा निश्चय मी केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांचे होणारे निराकरण माझ्या जनसेवेची सगळ्यात मोठी शिदोरी आहे असे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments