Type Here to Get Search Results !

चिंचोलीमाळी येथे कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणातील विद्युत खांबा वरील तारा तुटल्या, विद्यार्थी बालंबाल बचावले.

 चिंचोलीमाळी येथे कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणातील विद्युत खांबा वरील तारा तुटल्या, विद्यार्थी बालंबाल बचावले.



केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणातील विद्युत पोल वरील तारांवर झाडाची एक मोठी फांदी पडल्या मुळे दोन विजवाहक तारा तुटुन जमीनीवर पडल्या सुदैवाने यावेळी शाळा सुरु असल्यामुळे विद्यार्थी वर्गात होते.त्यामुळे काही अप्रिय दुर्घटना घडली नाही.शाळेच्याप्रांगणातील विद्युत पोल व विजवाहक तारा काढुन घ्याव्यातअशी मागणी महावितरणचे उप मुख्यकार्यकारी अभियंत्या कडे शिक्षक व पालकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मंगळवारी दुपारच्या सत्रा नंतर शाळा भरल्या नंतर चिंचोलीमाळी येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणात आसलेल्या विद्युत पोलवर जवळच असलेल्या झाडाची मोठी फांदी तुटुन पडल्यामुळे दोन तारा तुटून जमीनीवर पडल्या.यावेळी सर्व विद्यार्थी वर्गात असल्या मुळे पुढील अनर्थ टळला.

कर्मवीर विद्यालयाच्या वतीने महावितरणचे उप मुख्यकार्यकारीअभियंता ,केज यांना शाळेच्या परीसरातील धोकेदायक तारा काढुन घेण्याबाबत अनेक वेळा तोंडी सांगुन व लेखी निवेदने देवूनही महावितरणचे अधिकारी व लाईनमन यांनी हेतु पुरस्परपणे शाळेच्या परीसरातील विद्युत पोल वरील धोकेदायक तारा काढुन घेतल्या नाहीत. आतातरी महावितरणचे अधिका-यांनी आपल्या कनिष्ठ अभियंता व लाईनमनला आदेश देऊन तात्काळ कर्मवीर विद्यालयाच्या परीसरातील धोकेदायक विद्युत तारा काढुन घ्याव्यात.अशी मागणी शिक्षक व पालकां नी निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments