Type Here to Get Search Results !

बनसारोळा येथील जनविकास महा विद्यालयात मुन्शी प्रेमचंद यांची जयंती साजरी

 बनसारोळा येथील जनविकास महा विद्यालयात मुन्शी प्रेमचंद यांची जयंती साजरी



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महा विद्यालयात कथासम्राट मुन्शी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपलेविचार व्यक्त करताना प्रेमचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रेमचंद यांचा जन्म दि.३१ जुलै १८८० रोजी बनारसमधील लम्ही या छोट्याशा गावात झाला.प्रेमचंद लहान आणि सामान्य कुटुंबातील होते.लहानपणापासूनच त्यांचे जीवन अनेक संघर्षां तून गेले होते.मुन्शी प्रेमचंद अवघ्या आठ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे एका गंभीर आजाराने निधन झाले. अगदी लहान वयातच आईच्या निधनामुळे प्रेमचंद यांना लहानपणा पासूनच आई-वडिलांचे प्रेम मिळू शकले नाही. लहानपणापासूनच त्यांना हिंदीबद्दल वेगळी ओढ होती.त्यासाठी त्यांनीस्वत: प्रयत्न सुरू केले आणि एका छोट्या कादंबरीतून सुरुवात केली.त्यांच्या आवडीनुसार ते लघु कादंबऱ्या वाचत असत. वाचनाची ही आवड असल्याने त्यांनी पुस्तकांच्या विक्रेत्याकडे काम करायला सुरुवात केली.त्यामुळे त्यांचा दिवसभर पुस्तकवाचनाचा छंद पूर्ण होत राहिला. असे अध्यक्षीय समारोपा मध्ये विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.मुरलीधर लहाडे यांनी केले. ‌‌या कार्यक्रमासाठी महा विद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.गोपाळ भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments