Type Here to Get Search Results !

युवा ग्राम विकास मंडळाच्या पुढाकाराने काळूचीवाडी आणि आईचा तांडा येथील पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितींच्या सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न.

 युवा ग्राम विकास मंडळाच्या पुढाकाराने काळूचीवाडी आणि आईचा तांडा येथील पाणी पुरवठा आणि स्वच्छता समितींच्या सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न.


  


केज/प्रतिनिधी 


युवा ग्राम विकास मंडळ आयोजित शुद्ध पिण्याचे पाणी प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी पञकार श्री.अनिल जी महाजन, कार्यक्रम उद्घाटक डॉ. हनुमंत सौदागर,प्रमुख मार्गदर्शक श्री.मधुकर वाघ सेवानिवृत्त शाखा अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,श्री. बी.के.कापरे अध्यक्ष युवा ग्राम,श्री.विश्वनाथ तिडके  सरपंच पिंपरवाडा/ आईचा तांडा,श्री.महादेव खेडकर सरपंच तरनळी / काळूचीवाडी,श्री. शशिकांत साखरे ग्रामसेवक,पिंपरवाडा, प्रकल्प समन्वयक श्री. संतोष रेपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रशिक्षणाला सुरवात करण्यात आली. प्रकल्प समन्वयक श्री. संतोष रेपे यांनी प्रास्ताविकातून प्रकल्पाचे ध्येय आणि उद्धिष्ठ व पूर्ण झालेल्या कामाचाअहवाल सांगितला.डॉ.हनुमंत सौदागर यांनी आपल्या मार्गदर्शनातून गावात कोण कोणत्या समित्या कार्यरत असतात.पाणी पुरवठा व स्वच्छतासमिती गावात काय काम करते, ही समिती स्थापन करणे का महत्वाचे आहे गाव पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची भूमिका काय? गावातीलपाणीपुरवठ्याची जबाबदारी कोणाची? गाव स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणाची? पाणीपुरवठ्यावर कोणाचे नियंत्रण आहे?यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शक श्री. मधुकर वाघ यांनी पाणी पुरवठा समिती कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सांगत पाणी पुरवठा योजना  देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक बाबी,विहीर व बोअर पुनर्भरण उपाय योजना शोषखड्डे महत्व, डासमुक्त गाव,रूफ वाॕटर हार्वेस्टींगच्या महत्वावर डिजिटल माध्यमाद्वारे दृष्टीक्षेप टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अनिलजी महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून गावातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती आणि पाणी वापर गट यांची पिण्याच्या पाण्याबाबत भूमिका सांगत गावातील पिण्याच्या पाण्याची वर्तमान परिस्थितीची ओळख,ग्रामीण भागातील पाण्याचे उपलब्ध स्त्रोत आणि क्षेत्रे,गावांमध्ये कपडे धुण्याची स्थिती, ग्रामीण भागातीलआरोग्य, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचे महत्त्व आणि त्या बाबत आपल्या जबाबदा-या,सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित पिण्याच्या पाण्याची गरज शाळा,मंदिर,अंगणवाडी आणि इतर पिण्याच्या पाण्यासाठी दहा वर्षात तुम्ही तुमच्या गावाचा अंदाज कसा घ्याल? पिण्याच्या पाण्यासाठी आदर्श गाव बनवण्यात तुमची कोणती भूमिका असेल ? यावर सखोल मार्गदर्शन केले.या एक दिवसीय प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रकाश काळे यांनी केले तर हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी सचिन आडे,महादेव खेडकर,विश्वनाथ तिडके, संभाजी वळसे,विनोद सारुक,जनक सानप इतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments