Type Here to Get Search Results !

जुन्या आठवणींनाउजाळा देत जिल्हा परिषद हायस्कूल केज सन १९८६ च्या दहावी बॅचने लोणावळा येथे केले मोठ्या उत्साहात तिसरे गेट-टुगेदर.

 जुन्या आठवणींनाउजाळा देत जिल्हा परिषद हायस्कूल केज सन १९८६ च्या दहावी बॅचने लोणावळा येथे केले मोठ्या उत्साहात तिसरे गेट-टुगेदर.



केज/प्रतिनिधी


एके काळी बीड जिल्ह्यात नावा-रूपास असलेली जिल्हा परिषद हायस्कूल केज येथील सन १९८६ दहावीच्या वर्गाच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी दिनांक २७ व२८ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आनंदात गेट-टुगेदरसाजरे केले,वास्तविक पाहता दहावीनंतर एकत्र येणे व आपापले सुखदुःख आपल्या बाल मित्रांना सांगणे यात खूप आनंद आहे.त्यावेळच्या दहावी वर्गातील विद्यार्थी प्रवीण देशपांडे यांच्या संकल्पने तून एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. यामध्ये दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम केले. जसजसे व्हाट्सअप ग्रुप मध्ये संख्या वाढू लागली . तसतसे नवनवीन जुनेमित्र ग्रुप मध्ये दाखल झाले. नंतर सर्वानुमते कानडी माळी येथे रामकिशन राऊत यांच्या शेतात उत्साहाने पहिलेगेट-टुगेदर संपन्न झाले यावेळीत्यांच्या वर्ग शिक्षकांना आमंत्रीत करण्यात आले नंतर शिक्षकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत पहिले गेट-टुगेदर पार पाडले.ग्रुप सभासदसंख्या वाढत गेली.नंतर दुसरे गेट -टुगेदर वर्गमित्र राजूपांगळ यांच्या फार्म हाऊस वर कुर्डूवाडी येथे आनंदात पार पडले.नंतर वेगळे काहीतरी करावे म्हणून तिसरे गेट-टुगेदर लोणावळा येथे करायचे ठरवले.लोणावळा येथे चार बंगले घेऊन या ठिकाणी विविध ठिकाणा हून आलेले वर्गमित्र एकत्र जमले यामध्ये प्राध्यापक, प्रोफेसर,सध्या मोठमोठ्या हुद्द्यावर असणारे मित्र,  व्यवसायिक,शिक्षक हेसर्व स्वतःला विसरून फक्त आपण विद्यार्थी आहोत असे या गेट-टुगेदर कडे पाहत होते कोणताही मनात भेदभाव नव्हता. संगीताच्या मैफिलीत, गाण्याच्या सुरेल आवाजात,नृत्य करत विविध पदार्थाचा आस्वाद घेत पिकनिक पॉईंट पाहिले.दुसऱ्या दिवशी लोणावळा येथील नारायणीधाम,स्वामीसमर्थ मंदिर,एकवीरा देवी, आळंदी करत केज येथे समारोप केला.लोणावळा गेट-टुगेदरला मनीषा आनंदगावकर,श्री व सौ. राजेश पांगाळ,श्री व सौ‌. प्रविण देशपांडे,सरोज इंगळे श्री व सौ धनंजय धाट,श्री व सौ.राजेंद्र शिंदे, श्री व सौ.महादेव दळवे   श्री व सौ.देवा पेंढारे,

श्री व सौ गोविंद जाजू, मीना जाजू व जिजाजी, मंजुषा डोंगरे,वंदना डोंगरे, पांडुरंग पारेकर,अरुणा बहिर,शोभा अंधारे,श्री व सौ.जगदीश लहूरीकर

श्री व सौ.जगन्नाथ मस्के

श्री व सौ.सुहास घाट

श्री व सौ.दिनकर नाईकवाडे,श्री व सौ. रामकिसन राऊत,शालन चौभारकर,दत्ता चाटे

श्री व सौ.दिलीप साखरे,

श्री व सौ.धनराज अंधारे, श्री व सौ‌ राजाभाऊ काळेगोरे श्री व सौ. मेनकुदळे धनंजय,अनिल कवटेकर,श्री व सौ.मनोज दरक,श्री व सौ.दिनकर चाटे इत्यादी उपस्थित होते.मैत्री दिनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वी करण्यास राजेश पांगांळ यांच्या अथक परिश्रमातून व प्रवीण देशपांडे,मनीषा आनंदगावकर यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली, सर्व मित्र मैत्रिणीच्या सहकार्याने हे गेट-टुगेदर अतिशय उत्साहात व खेळीमेळीच्यावातावरणात पार पडले.

Post a Comment

0 Comments