Type Here to Get Search Results !

चिंचोलीमाळी येथे श्री संत सावतामहाराज पुण्यतिथी सप्ताहा निमीत्त किर्तन सेवा संपन्न

 चिंचोलीमाळी येथे श्री संत

सावतामहाराज पुण्यतिथी सप्ताहा निमीत्त किर्तन सेवा संपन्न


.


केज /प्रतिनिधी 


केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे संत श्रेष्ठ श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त सप्ताहातील तिसऱ्या दिवसाचे कीर्तन पुष्प ह.भ.प.पुष्पाताई महाराज यांनी पुण्यवंत व्हावे।घेता सज्जनाची नावे॥नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फुकासाठी ॥या अभंगावर विवेचन करताना प्रपंचामध्ये राहून सुद्धा पुण्य कमवता येते आणि पुण्य कमवायचे असेल तर सज्जनाचे म्हणजेच संतांचे नाव घेतल्यानंतर अथवा देवाचे नाव घेतल्यानंतर पुण्य प्राप्त होते आणि संताचे अथवा देवाचे नाव घेण्या साठी काही किंमत मोजावी लागत नाही अगदी फुकट आहे एवढेच नव्हे तर मनुष्य जीवाचा विसावा संत आहेत किंवा देव आहेत म्हणून सज्जनाचे नाव घ्यावे सज्जनाच्या नाव घेण्याने नुसते पुण्यच पदरात पडत नाही तर माणसाच्याहातून जे काही पापे घडली जातात हे सर्व पाप निघून जातात.तुका म्हणे पापे ।जाती संताचिया जपे॥पुढे बोलताना संतश्रेष्ठ श्रीसंत सावता महाराज यांचे जीवन चरित्र अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सांगितले.श्री संत सावता महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी या सर्वांमध्ये विठ्ठल पाहिला हा संदेश अगदी मोलाचा आहे म्हणूनच आजच्या कीर्तनातून महाराजांनी आपणाला सज्जनाची नावे घेतल्यानंतर पुण्यवंत होता येते असे उत्कृष्ट प्रकारचे मार्गदर्शनाने कीर्तनपुष्प श्रीसंत सावता महाराजांच्या चरणी समर्पित केले.यावेळी पंच क्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments