Type Here to Get Search Results !

केज शहराला अतिक्रमणा चा विळखा,वाढत्या अतिक्रमणावर कोणाची मेहरबानी ?

 केज शहराला अतिक्रमणा चा विळखा,वाढत्या अतिक्रमणावर कोणाची  मेहरबानी ?



 केज/प्रतिनिधी


केज शहरातील मुख्य रस्त्याच्या लगत उजव्या बाजूला कृषी विभागाच्या फलोत्पादनाच्या जागेत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अतिक्रमणधारक बिनधास्तपणे हवी तेवढी जागा पकडून त्यावर कब्जा करत आहेत.तिथे पत्र्याचे शेड उभा करून ते व्यावसायिकांना भाड्याने दिले जातआहे.अतिक्रमण करणारे हे धनदांडगे लोक कोण? त्यांना कोणाचा वरदहस्त आहे.अद्याप पर्यंत पोलिसांकडे कृषी विभागाकडून साधी तक्रार ही केली गेली नाही.तक्रार आली नाही म्हणून पोलिसांनी काही कारवाई केली नाही मात्र त्यामुळे अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे.अतिक्रमण धारकांवर कारवाई का होत नाही ? त्यांच्यावर प्रशासन का मेहरबान आहे ? असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

पंकज कुमावत यांनी फिरवला होताअतिक्रमणा वर हातोडा.

तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी दबंग कारवाई करतअतिक्रमणा वर हातोडा फिरवला होता त्यांची बदली झाली आणि काही दिवसातच केजचे अतिक्रमण जैसे थे नव्हे तर त्याहून अधिक वाढले आहे.

कृषीअधिकारी,तहसील दार,पोलीस निरीक्षक गप्प का ?

दिवसाढवळ्याअतिक्रमणा चा विळखा वाढत असताना केज तालुका कृषी अधिकारी,नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी,केजचे तहसील दार,पोलीस निरीक्षक,उप विभागीय अधिकारी अतिक्रमण होत असताना हे सर्व बघूनही गप्प का आहेत ? कारवाई का केली जात नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्यवसायिकांना जागा हवीच.


छोट्या व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध होणे आवश्यकच आहे मात्र अतिक्रमण करणारे धन दांडगे ती जागा पकडून त्याचे आव्वाच्या सव्वा  भाडे दर लावून छोट्या व्यवसायिकांची लूट करून,पैसे उकळून मालामाल होत आहेत.

शहरात होत असलेले

वाढते अतिक्रमण काढून फलोत्पादनाच्या जागेत व्यावसायिक टपरी धारकांना हक्काचे गाळे उपलब्ध करून द्यायला हवेत याकडे लोक प्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

Post a Comment

0 Comments