Type Here to Get Search Results !

कृषि सेवा केंद्र दुकानदारा चा मोबाईल हॅक करून सत्तर हजार रुपयाला चुना लावला.

 कृषि सेवा केंद्र दुकानदारा चा मोबाईल हॅक करून सत्तर हजार रुपयाला चुना लावला.



केज/प्रतिनिधी                 


केज तालुक्यातील एका कृषि सेवा केंद्राचे दुकानदार यांचा मोबाईल हॅक करून बँक खात्यातून सत्तर हजार रुपये परस्पर लांबविले आहेत.केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे प्रमोद रामराजे राऊत यांचे किसान कृषी सेवा केंद्र नावाचे दुकान आहे.त्यांचे महाराष्ट्र ग्रामीण बैंक शाखा चिंचोलीमाळी येथे चालू खाते व बचत खाते असे दोन खाते आहेत.दि.१ ऑगस्ट रोजी दुपारी १-०० वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या दोन्ही खात्यातून ५० हजार व २० हजार रुपये  कपात झाले असल्याचा मेसेज आला.त्यांनीत्यांच्या खात्याचा पासवर्ड किंवा पिन कोणालाही दिलेला नव्हता.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेशी संपर्कसाधून त्यांचे दोन्ही खाते होल्ड केले आहेत.त्यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. ४३४/२०२४ भा.न्या.सं. ३१८(४) आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेशपाटील हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments