Type Here to Get Search Results !

शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळ सदस्यपदी केजच्या भाई मोहन गुंड यांची निवड.

 शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळ सदस्यपदी केजच्या भाई मोहन गुंड यांची निवड.



केज/प्रतिनिधी


पंढरपूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात शेतकरी व कामगाराच्या प्रश्नावर सातत्याने लाल झेंडाघेऊन आवाज उठवणारे,प्रचंड जनसंपर्क असणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारा चळवळी तील प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाते.केजचे भूमीपुत्र भाई मोहन गुंड यांची सर्वानुमते निवड झाल्यामुळे प्रमाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे.भाई मोहन गुंड हे जवळपास सन २००४ पासुन पक्षात सक्रिय आहेत.ते शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवर सतत आवाज उठवत असतात. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी तडीस लावलेले आहेत भाई मोहन गुंड यांच्या निवडीमुळे मराठ वाड्यातील शेतकऱ्यांचा एक लढवय्या युवा नेता मिळाला आहे.राज्यात  शेतकरी,कामगार,विद्यार्थी,अदिवासी इतर सर्व समावेशक अनेक ठराव घेण्यात आले.शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ,मध्यवर्ती समिती सदस्यांच्या निवडी ही करण्यात आल्या. पक्षाचे सरचिटणीसम्हणून पुन्हा भाई जयंत पाटील यांची निवड झाली आहे. 

शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वीस वर्षांपासून सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमा तून संघर्ष करणाऱ्या केज चे भूमिपुत्र भाई मोहन गुंड यांची राज्य चिटणीस मंडळात नव्याने संधी मिळाली आहे.यामुळे सर्व पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते व पक्षाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.भाई मोहन गुंड यांना  पुढील वाटचालीस मिञ परिवाराकडुन शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments