Type Here to Get Search Results !

केजच्या लोकप्रतिनिधींची न झालेल्या कामासाठी श्रेयस्पर्धा मांजरा नदी वरील पूलासह रस्ता दुरुस्तीसाठी केविसंसचा दि.१४ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा

 केजच्या लोकप्रतिनिधींची न झालेल्या कामासाठी श्रेयस्पर्धा

मांजरा नदी वरील पूलासह रस्ता दुरुस्तीसाठी केविसंसचा दि.१४ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलनाचा इशारा



केज/प्रतिनिधी


केजच्या लोकप्रतिनिधींची न झालेल्या कामासाठी श्रेयस्पर्धा चालू आहे मात्र प्रत्यक्षात मांजरानदीवरील पुलासह रस्त्याच्या दुरुस्तीचे काम न करताच श्रेय घेण्याचे काम करत आहेत. अखेर मांजरा नदी वरील पूलासह रस्ता दुरुस्तीसाठी केज विकास संघर्ष समितीचा दि. १४ ऑगस्ट रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचाइशारा लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. अशी माहिती माध्यमाशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रा.हनुमंतभोसले यांनी दिली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,खामगाव पंढरपूर हा महामार्ग केज तालुक्यातून जात आहे बीड,धाराशिव या दोन जिल्ह्याच्या सीमे वर मांजरा नदी आहे या नदीवरील पुलाचे काम व सदर रस्त्याचे काममागील तीन ते चार वर्षापासून चालू असून अद्यापहीसदर काम पूर्ण झाले नसल्या मुळे अक्षरश मृत्यूचा सापळा बनला असून या ठिकाणी अनेक जणांचे अपघात झाले आहेत या रस्त्यावरून वाहन धारकां ना तारेवरची कसरत करावी लागतआहे.मांजरा नदीपुलाच्या दोन्ही बाजूनी एक किमी रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणासाठी आता आरपारचे आंदोलन करण्याचा निर्णय केज विकास संघर्ष समितीने घेतला असून या मागणी साठी दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी या भागातील सर्व वाहनचालक व जनते च्या सहभागाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीचे समन्वयक हनुमंत भोसले यांनी सांगितले आहे.

खामगाव-पंढरपूर महामार्गावर केज तालुका अंतर्गत मांजरा नदी पुला जवळ नवीन पुलाचे काम सुरू असुन सध्याची वाहतूक जुन्या पुलावरून सुरू आहे.मात्र यापुलाच्या दोन्ही बाजूनी मिळून अंदाजे दोन ते अडीच किमीचे अंतर आहे.सदर रस्त्यावर दोन ते तीन फूट खोलीचे खड्डे मोठ्या प्रमाणात पडले असून रस्त्यावर दगड-गोटे व मातीचे प्रमाण ही खूप मोठे आहे.या रस्त्यावर आजपर्यंत शेकडो अपघात झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे तरअनेकांना अपंगत्व आले आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर चोऱ्या व लूटीचे प्रमाण खूप वाढले असून अत्यंत धोकेदायक बनला आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची माहिती हे दोन्हीही जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी सह संबंधित यंत्रणा व प्रशासनाला चांगलेच ठाऊक आहे तरी देखील याकडे जाणीवपूर्वकदुर्लक्ष केले जात आहे.केज विकास समिती गेली चार वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणा साठी उपोषणे,धरणे, घंटानाद व रस्तारोको सारख्या आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहे.मात्र तरीही या गंभीर प्रश्नावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महा मंडळ दुर्लक्ष का करत आहे ? हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे समितीने वेळोवेळी केलेला पाठ पुरावा व आंदोलनामुळे कांही हालचाल झाली की, केज तालुक्याचे लोक प्रतिनिधी या कामाच्या श्रेयासाठी घोड्यावर बसतात व न झालेल्या कामाच्या आपल्या नांवे प्रसिद्धी माध्यमातून जाहिराती करतात. 

राज्यभर रस्त्याचे जाळे विणणारा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभाग लोकांचे जीव जाताना एवढा निष्क्रिय व मूग गिळून गप्प का आहे  हाही मोठा प्रश्न आहे.या पूर्वी  एमएसआरडीसीने रस्ता लवकर दुरुस्ती व डांबरीकरण करूनदेण्याचे तोंडी व लेखी आश्वासने दिली आहेत मात्र काम केले नाही.आता यावेळी या मागणीसाठी केज विकास संघर्ष समिती येत्या बुधवार दि.१४ ऑगस्ट रोजी या रस्त्या वरून प्रवास करणारे वाहनचालक व या भागा तील नागरिकांच्या सहभागाने मांजरा नदी पुलावर बेमुदत रास्तारोको आंदोलन करण्याचानिर्णय घेतला आहे.या आंदोलना त या परिसरातील गावकऱ्यांनी,वाहन चालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यातआलेआहे. निवेदनावर हनुमंत भोसले यांच्यासह नासेर मुंडे, शेषराव घोरपडे,संपत वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments