Type Here to Get Search Results !

हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी महसूल व तलाठी संघटनेची मागणी केज तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लक्षवेधी लेखनीबंद आंदोलन.

 हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष पवार यांची निघृण हत्या करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी महसूल व तलाठी संघटनेची मागणी

केज तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय लक्षवेधी लेखनीबंद आंदोलन.



केज/प्रतिनिधी


हिंगोली जिल्ह्यातील तलाठी संतोष देवराव पवार यांची निघृण हत्या  करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी महसूल संघटना व तलाठी संघटना यांनी लेखी मागणी केज तहसीलदार यांच्याकडे केली आहे.केज तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवून एक दिवसीय लेखनीबंद आंदोलन केले. 

या बाबतची सविस्तर माहिती अशी की,हिंगोली जिल्ह्यातील आडगावरंज येथील तलाठी सज्जाचे तलाठी संतोष देवराव पवार यांची दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी१२-००वाजण्याच्या सुमारास संतोष पवार हे तलाठी कार्यालयातकर्तव्य बजावत असताना त्यांच्या वर भ्याड हल्ला करून  त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून चाकूने भोकसून निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. 

सदर घटनेमुळे राज्यातील सर्व महसूल व तलाठी मंडळ अधिकारी व महसूल कर्मचारी यांच्या मध्ये असंतोषाची लाट उसळली आहे.संतोष पवार हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यामुळे संतोष पवार यांना शहीद कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा तसेच त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ ५० लाख रुपयांची मदत देऊन त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ शासकीय नौकरीत सामावून घेण्यात यावे तसेच सदरील खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात यावा व सदरील आरोपीला तात्काळ फासावर लटकवण्यात यावे जेणे करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सदरील घटने मुळे भयभीत झालेले आहेत व सदर घटनेने सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ सोडविला जावा त्या अनुषंगाने केज तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी एक दिवसीय लेखनी बंद आंदोलन केले आहे व सदरील घटनेचा निषेध नोंदवला आहे.सदर लेखी निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे केज तालुकाध्यक्ष श्री.जी.पी. नन्नवरे,अव्वल कारकून एम.बी.तोळमारे,जे.डी. पठाण,केज तालुका तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष डी.एम.मस्के, सचिव एस.सी.इनामदार, उपाध्यक्ष श्रीमती एम.बी. मुळे यांच्या सह कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments