Type Here to Get Search Results !

ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या केज तालुका अध्यक्षपदी समाधान बचुटे यांची निवड.

 ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या केज तालुका अध्यक्षपदी समाधान बचुटे यांची निवड.




केज/प्रतिनिधी


ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या केज तालुका अध्यक्षपदी समाधान बचुटे यांचीनिवड ही ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या आदेशावरून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन गायकवाड,मराठवाडा युवक अध्यक्ष अक्षय भुंबे, जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून समाधान बचुटे यांची केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

समाधान बचुटे हे गेले अनेक वर्षापासून दलित चळवळीमध्ये सक्रियपणे काम करत आहेत या कामाची दखल घेत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी त्यांच्या दलित चळवळीतील कामाचा आढावा घेऊन संघटना वाढवण्यासाठी,संघटनेचे उद्दिष्टे जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी समाधान बचुटे यांची केज तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दिनांक ११ ऑगस्ट२०२४ रोजी अंबेजोगाई येथील शासकीय विश्रामगृह येथे ऑल इंडिया पॅथर सेनेच्या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्येऑलइंडिया पॅथर सेनेच्या केज तालुका अध्यक्षपदी समाधानबचुटे यांची निवड करण्यात आलीआहे.सदर निवडी मुळे समाधान बचुटे यांच्या मित्र परिवाराकडूनत्यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे व त्यांचेठिकठिकाणी अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी ऑल इंडिया त्यानंतर सेनेचेपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments