Type Here to Get Search Results !

आदर्श क्रांती मराठी न्यूजच्या बातमीचा दणका कानडी रोड रस्त्याची दुरावस्थेची बातमी प्रकाशित होताच यश कंट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम उपविभाग सुतासारखे सरळ होऊन रस्त्याचे काम केले चालू स्त्यचे काम चालू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण.

 



आदर्श क्रांती मराठी न्यूजच्या बातमीचा दणका कानडी रोड रस्त्याची दुरावस्थेची बातमी प्रकाशित होताच यश कंट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम उपविभाग सुतासारखे सरळ होऊन रस्त्याचे काम केले चालू

स्त्यचे काम चालू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण.



केज/प्रतिनिधी

आदर्श क्रांती मराठी न्यूजनहींने यश कन्ट्रक्शनच्या आडमुठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत.यश कंट्रक्शनला नेमके अभय कोणाचे ? असा सवाल स्थानिक नागरिकासह प्रवाशांमधून उपस्थित केला जातहोता. या आशायाची बातमी प्रसिद्ध होताच यश कंट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम उपविभाग केज हे सुतासारखे सरळहोऊन सदर बातमीची वस्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ रस्त्याचे काम चालू केले आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच स्थानिक नागरिकांनी  आदर्श क्रती मराठी न्यूजच्या संपादकाचे आभार मानले आहेत. 

तसेच क्रांतीनगर येथील स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे प्रशासनास मंगळवार रोजी आंदोलन करण्याचा क्रांती नगर येथील नागरिकांनी प्रशासनास  इशारा दिला होता.परंतु सदर योजनेची व बातमीची प्रशासनाने देखील दखल घेऊन संबंधित गुत्तेदारास काम करण्याचे आदेश दिले व तशा सूचना देखील दिल्या आहेत.केज शहरातून कानडी माळी सह ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्याचे काम हे सहामहिन्यापासून यश कंट्रक्शन करत आहे. 

केज-कानडी माळी हा रस्ता कोकीसपिर, क्रांतीनगर ते क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी पर्यंत गेल्या सहा महिन्यापासून काम चालू आहे.तसेच नाले बांधकाम काही ठिकाणी पूर्ण झाल्यामुळे एक महिन्यापासून सर्व जुना डांबरी रस्ता खोदून ठेवल्यामुळे व सदर रस्त्याच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी केज नगरपंचायतची धनेगाव ची पाईपलाईन फुटल्या मुळे गेले तीन महिन्या पासून येथील रहिवासी नागरिकांना पिण्याचे पाणी नाही.सध्या पावसाळा चालू आहे दररोजच्या पावसामुळे सर्व रस्त्यावर चिखल, गाळ झाल्यामुळे दररोज ५० ते ६० मोटरसायकल स्लीप होऊन नागरिक पडत आहेत यामध्ये महिला,मुली-मुले वयोवृद्ध नागरिक यांचे प्रमाण अधिक आहे.काही ठिकाणी जुने लाईटचे पोल काढून नवे पोल बसविले आहेत तर काही ठिकाणी जुने तसेच आहेत.येत्या तीन दिवसात सदर रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करण्यात  यावे अशीलेखी निर्णयाद्वारे केज तहसील दार यांच्याकडे मागणी केली होती.अन्यथा मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता हनुमान मंदिरासमोर क्रांतीनगर येथील कानडी रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा येथील नागरिकांनी तहसीलदार केज यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला होता.आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील स्थानिक नागरिक म्हणाले की,गेले अनेक दिवसापासून सदर रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने यश कंट्रक्शन चे इंजिनिअर व कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागीय केज यांना वेळोवेळी तक्रार करून व भेटून देखील आमच्या कामाची कसल्याच प्रकारची दखल घेतली नव्हती या उलट आम्हाला उडवा उडवीची उत्तरे देत होते. तसेचकाही ठिकाणी नालीचे काम झाले आहे परंतुबऱ्याचशा ठिकाणी नालीला पूर्णपणे तडे गेले आहेत त्यामुळे सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील लोकप्रतिनिधी वबांधकाम विभाग डोळेझाक पणा करत आहे असाही नागरिकांना आरोप केला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की,सदर रस्त्याचे नालीचे काम अनेक ठिकाणी केले असून काही ठिकाणी गल्लीतील येणाऱ्या रस्त्यापर्यंत नालीचे काम केले आहे. गल्लीतील येणाऱ्या रस्त्याला नालीचे काम जोडलेले नसल्यामुळे पावसाचे पाणी व सदर नालीचे पाणी रस्त्यावरून येत असल्यामुळे या भागा तील रहिवासी नागरिकांना व या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याग्रामीण भागातील वाहनचालकांना तारावरची कसरत करावी लागत आहे. यशकंट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून त्यांना भेटून संपर्क साधला तरी देखील ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत होते. तसेच यश कंट्रक्शनच्या आडमुढ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे नाहक त्रास होत आहे सदरचे काम हे आमदार फंडातून आलेले आहे या कामाकडे आमदार नमिता मुंदडा यांचेही देखील लक्ष नाही. लोकप्रतिनिधी हे स्वतःची टक्केवारी घेऊन गप्प बसत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे यांनी केला होता.पुढे बोलताना गालफाडे म्हणाले की, सदर रस्त्याचे काम करत असताना पाण्याची पाईप लाईन फुटली अथवा ना दुरुस्त झाली तर ती दुरुस्त करण्याची जबाबदारी ही यश कंट्रक्शनची असताना ते टाळाटाळ करत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही बांधकाम विभागाशी संपर्क केला ते तोंडीच म्हणतात आम्ही सदर कंट्रक्शनला पाईपलाईनचे काम करायला सांगतो परंतु अद्यापही पाईप लाईनचे काम पूर्ण झाले नाही.या यश कंट्रक्शनला नेमका अभय कोणाचा आहे? व त्यांना कोण पाठीशी घालत आहे असा ही बाबुराव गालफाडे यांनी सवाल उपस्थित केला होता.वरील आशयाची बातमी दैनिक राजयोग मध्ये प्रकाशित होताच सदर बातमीची व स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने संबंधित तात्काळ सदर रस्त्याचे काम करण्याचे आदेश देऊन तसेच सूचनादेखील दिल्या आहेत.त्यामुळे सदर रस्ता रोको आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात पाठीमागे घेण्यात आले आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाबुराव गालफाडे व युवा नेते शकील भैय्या सय्यद यांनी दिली आहे.




Post a Comment

0 Comments