Type Here to Get Search Results !

कै.भास्करराव शिनगारे यांच्या पुण्यस्मरणार्थ वादविवाद व वक्तृत्व स्पर्धे मध्ये स्वामी विवेकानंद शाळेचे नेत्रदीपक यश फिरत्या चषकासह विविध पारितोषिके विद्यार्थ्यांनी पटकावली

 कै.भास्करराव शिनगारे यांच्या पुण्यस्मरणार्थ वादविवाद व वक्तृत्व स्पर्धे मध्ये स्वामी विवेकानंद शाळेचे नेत्रदीपक यश

फिरत्या चषकासह विविध पारितोषिके विद्यार्थ्यांनी पटकावली


.


केज/प्रतिनिधी


कै.भास्करराव शिनगारे यांच्या पुण्यस्मरणार्थ धारूर येथील दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडलेल्या वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेमध्ये केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन्ही गटा तील बक्षिसे मिळून घवघवीत यश संपादन केले.माध्यमिक गट ८ वी ते १० वीमध्ये चि.आदित्य सूर्यवंशी व कु.संस्कृती जाधव यांनी प्रथम पारितोषिक पटकावत फिरते चषक (ढाल) व रोख रक्कम ५००१/- रुपये मिळविले.तसेच प्राथमिक विभाग गट ५ वी ते ७ वी मध्ये कु.आरती चाटे हिने द्वितीय क्रमांक पटकावत रोख रक्कम २००१/- रुपये मिळविले. व कु.अमृता शिंदे हिने उत्तेजनार्थ रोख १०१/- रुपये मिळविले.वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळे तील सहशिक्षक श्री. सत्वधर सर यांचेमार्गदर्शन लाभले.याप्रसंगी पारितोषिक घेतानासमवेत श्रीमती.इरे मॅडम व श्री. प्रबोधकांत समुद्रेउपस्थित होते.


वरील सर्व विजेत्या स्पर्धकांचे जीवन विकास शिक्षण मंडळ या संस्थेचे अध्यक्ष श्री. अंकुशरावजी इंगळे, संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे, शेकापचे राज्य कमिटी सदस्य भाई मोहन गुंड शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. शिवनंदा मुळे, श्री. श्रीकिशन नेहरकर सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद आदींनी हार्दिक अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.


Post a Comment

0 Comments