Type Here to Get Search Results !

केज विधानसभेसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयारआणखी पुलाखालून पाणी जाणे भरपूर बाकी

केज विधानसभेसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार


आणखी पुलाखालून पाणी जाणे भरपूर बाकी

केज/प्रतिनिधी

केज विधानसभेसाठी अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत परंतु आणखीन पुलाखालून पाणी जाणे भरपूर बाकी आहे. 
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी केज विधानसभा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षापासून अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव आहे. विधानसभेच्या निवडणुका या दोन महिन्याच्या सरासरी वर येऊन ठेपल्या आहेत बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी केज मतदार संघामध्ये निवडणुकीचे वातावरण सध्या तापू लागले आहे. 
केज विधानसभेसाठी अनेक जण इच्छुक आहेत व ते सध्या निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत परंतु आणखी बरस पाणी पुलाखालून जाणे बाकी आहे. 
मागील साडेचार ते पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नावर आवाज न उठवणारे आज विधानसभा लढविण्याची तयारी करीत आहेत अशी चर्चा ग्रामीण भागातील नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे. 
सध्या भाजपच्या विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा या अनेक गावांमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमास व कामाच्या उद्घाटनास जाऊन नागरिकाशी संवाद साधत आहेत तर त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे देखील गाव भेटी घेत कार्यक्रमास हजेरी लावून नागरिकाशी संवाद साधत आहेत. 
आमदार नमिताताई मुंदडा व त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा आणि त्यांचे पती अक्षय मुंदडा हे मागील साडेचार ते पाच वर्षात केलेल्या कामाची माहिती सांगून जनसंपर्क वाढविण्याचे काम करत आहेत परंतु केज मतदार संघात फारसा विकास आमदार नमिता ताईमुंदडा यांनी केला नाही असे नागरिकांतून बोलले जात आहे व सध्या नागरिकांतून नाराजीचा सूर निघत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 
भाजपाच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे यादेखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत त्या मागील साडेचार वर्षे घरी थांबून होत्या त्यांना पक्षांनी२०१९ मध्ये थांबण्यास सांगितले होते परंतु त्यांनी एका आठवढयापूर्वी अंबाजोगाई येथे व केज येथील स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे सूतगिरणी येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले मी सध्या भाजप या पक्षात आहे व भाजप पक्षाकडूनच२०२४ ची केज विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. वेळप्रसंगी पक्षाने उमेदवारी जर नाकारली तर वेगळा विचार केला जाईल कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार आहे असे माजी आमदार ठोंबरे यांनी ठाम सांगितले आहे. माजी आमदार संगीताताई ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्या व त्यांचे पती विजय प्रकाश ठोंबरे हे दोघेजण शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली असता त्या शरद पवार यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मतदारसंघांमध्ये रंगल्या होत्या परंतु त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितले की, त्यांनी सांगितले  मी माझ्या एका खाजगी कामानिमित्त गेले होते. भाजप विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांना उमेदवारी देईल का? त्यांना डावलून माझी आमदार संगीताताई ठोंबरे यांना देईल का? यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाला देतील का?असेही तर्कवितर्क मतदारातून लावले जात आहेत. 
माजी आमदार पृथ्वीराज साठे हे २०१९ च्या विधानसभेला पराभूत झाल्यापासून ते मतदार संघात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे तसेच ते शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फुटला तरी ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाचे काम केले आहे. 
केज मतदार संघामध्ये पृथ्वीराज साठे यांना मानणारा एक मोठा वर्ग असल्याचे पहावयास मिळत आहे सध्या माजी आमदार पृथ्वीराज साठे हे देखील ग्रामीण भागातील गावागावात जाऊन छोट्या मोठ्या कार्यक्रमास उपस्थित राहून नागरिकांशी चर्चा करून जणसंपर्क वाढवत आहेत. परंतु शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे निष्ठावंत साठे यांना उमेदवारी देइल का? त्यांना पक्ष डावलेल का? असेही  बोलले जात आहे. 
बहुजन विकास परिषदेचे अध्यक्ष रमेश गालफाडे हे देखील केज विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी गेले आठवड्यामध्ये मोठा जनसंवाद मेळावा घेऊन निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली असून या मेळाव्यास उभाठा गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांना आणले होते. 
तसेच रमेश गालफाडे यांनी या मेळाव्यातून घोषणा केली मला एका मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळणार आहे आणि मी कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. 
रमेश गालफडे यांनी लोकसभेला खासदार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा दिला होता त्यांनी खासदार सोनवणे यांचे काम केले तर आता खासदार सोनवणे हे गालफाडे यांना मदत करतील का? अशाही चर्चा मतदारातून ऐकण्यास मिळत आहेत सध्या रमेश गालफाडे ही केज येथे तळ ठोकून आहेत ते ग्रामीण भागात जाऊन जनसंपर्क साधत आहेत. 
मागील १५ ते २० दिवसापासून डॉ. अंजली घाडगे यादेखील मतदार संघात फिरताना दिसत आहेत परंतु त्या सध्या तरी कुठल्याच पक्षात नसल्याचे दिसून येते परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याही चर्चेत आहेत. डॉ. अंजली घाडगे या निवडणूक लढवणार असल्याचे ठाम भूमिकेत आहेत त्यांना एका मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळणार आहे असे ते सांगत आहेत सध्या त्या पण काही गावात जाऊन मतदाराशी संपर्क साधत आहेत. त्या नेमक्या कोणत्या पक्षात जाणार आहेत ते अद्यापही पष्ट नाही. 
या व्यतिरिक्त विजयकुमार वाव्हळ, डॉ.राहुल शिंदे डॉ. नयनाताई शिरसाट, इंजिनियर जाधव,शिंदे यांच्यासह अनेक जण  इच्छुक आहेत व सध्या ते तयारीला लागलेले आहेत. 
केज मतदारसंघांमध्ये दिवसांनी दिवस निवडणुकीचे वातावरण गरम होत असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे मतदार हा जागृत असल्याचे दिसून येत असून मागील पाच वर्षात कोणी कोणी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठून कामे केलेली आहेत असेही चर्चा नागरिकांतून ऐकण्यास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments