Type Here to Get Search Results !

स्व.विश्वंभर कोकिळ यांच्या सातव्या पुण्य स्मरणार्थ भव्य शालेय वक्तृत्व व वादविवादस्पर्धा संपन्न अंकुशरावइंगळे,जी.बी.गदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले पारितोषिक वितरण

 स्व.विश्वंभर कोकिळ यांच्या सातव्या पुण्य स्मरणार्थ भव्य शालेय वक्तृत्व व वादविवादस्पर्धा संपन्न

अंकुशरावइंगळे,जी.बी.गदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले पारितोषिक वितरण


.


केज/प्रतिनिधी 


जीवन विकास शिक्षण मंडळ केज व कोकिळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीविवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय केज या शाळे मध्ये दि.२२ आॕगस्ट २०२४ रोजी संस्थेचे संस्थापक सचिव स्व. विश्वंभर काका कोकिळ यांच्या सातव्या पुण्य स्मरणार्थ भव्य शालेय वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेचे आयोजनकरण्यात आले होते.या कार्यक्रमा साठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक अभिमानडोईफोडे गुरुजी उपस्थित होते.इतर मान्यवरांमध्ये जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री. अंकुशरावजी इंगळे, संस्थेचे सचिव तथा मार्गदर्शक श्री.गिन्यानदेव गदळे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शैलाताई इंगळे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलचे प्राचार्य श्री.गणेश कोकीळ आदी उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये ईयत्ता ५ वी ते ७ वी गटातील वक्तृत्व स्पर्धेसाठी "महाराष्ट्राचा अभिमान - पंढरीची वारी" हा विषय देण्यात आला  होता.या स्पर्धेमध्ये लहान गटातून प्रथम पारितोषिक पटकाविण्याचा मान कु. स्वस्तिका दिनकर राऊत, युसुफवडगाव मा.व उच्च मा.वि.युसुफवडगाव या शाळेच्या विद्यार्थिनीने मिळविला.चि.अर्णव दत्तप्रसाद सारडा,आदर्श प्राथमिक विद्यालय घाट नांदुर हा द्वितीय आला. तर कु.अवनी सूर्यकांत गिते,लक्ष्मीश्वर विद्यालय घाटनांदुर ही तृतीय आली. या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक कु.श्रेयादिपक पवार युसुफवडगाव मा.व उच्च मा.वि.युसुफवडगाव या शाळेच्या विद्यार्थिनीला मिळाले.या स्पर्धेमध्ये ईयत्ता ८ वी ते १० वी  गटातील वादविवाद स्पर्धे साठी "ऑनलाइन शिक्षण हे पारंपारिक वर्गातील शिक्षणाइतकेच प्रभावी आहे किंवा नाही ?" हा विषय देण्यात आलाहोता. या स्पर्धेमध्ये मोठ्या गटा तून प्रथम पारितोषिक पटकाविण्याचा मान सोफिया पाशा सय्यद व कु.सुषमा सतीश सोळुंके, नूतन माध्यमिक विद्यालय अंजनडोह या शाळेच्या संघाला मिळाला. कु.अनुष्का हरिभाऊ माके व कु.गायत्री बळीराम आदनाक,संभाजीराव बडगिरे माध्यमिक वि. ममदापूर हा संघ द्वितीय आला.तर कु.स्नेहलसंतोष म्हेत्रे व कु.श्रावणी अतुल शेळके,जयभवानी विद्यालय लोखंडी सावरगाव हा संघ तृतीय आला.या स्पर्धेतील उत्तर्जनार्थ पारितोषिक कु.आरती अनंत चाळक व कु.श्रावणी अनंत फावडे,जनता माध्यमिक विद्यालय धारूर या शाळेच्या संघाला मिळाले. पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणुन जीवन विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री.अंकुशराव इंगळे, सचिव श्री.जी.बी.गदळे, शालेय नियोजन समिती च्या अध्यक्षा शैला इंगळे, मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,दै.सकाळचे रामदास साबळे,अजय देशपांडे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डॉ.बाबासाहेब हिरवे हे होते.यास्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ५ वी ते ७ वी वक्तृत्व स्पर्धेच्या गटा साठी जनार्दन सोनवणे, प्रा.विठ्ठल समुद्रे,प्रभाकर बोबडे तसेच ८ वी ते १० वी वादविवाद स्पर्धेच्या गटासाठी सेवानिवृत्त शिक्षक हनुमंत घाडगे, प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर,प्रा.डॉ.बाबासाहेब हिरवे यांनी भूमिका पार पाडली.प्रास्ताविक मेघश्याम मंगरुळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुञ संचलन प्रबोधकांत समुद्रे व महादेव गिरी यांनी केले व आभार दत्ता सत्वधर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments