Type Here to Get Search Results !

रमाई महिला भजन मंडळाच्या वतीने उत्तर नागपूरमध्ये शाहिरांचा जाहीर सत्कार कार्यक्रम

 रमाई महिला भजन मंडळाच्या वतीने उत्तर नागपूरमध्ये शाहिरांचा जाहीर सत्कार कार्यक्रम  



नागपुर/प्रतिनिधी 


नागपूर सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई,वैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूर,विश्वभूषण सांस्कृतिक लोक कला मंच नागपूर,यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शाहीर संमेलन व विविध कला महोत्सव दिनांक २८ आॕगष्ट २०२४ रोजी  बुधवारी सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह,सिद्धार्थ नगर टेका नाका नागपूर येथे  मोठ्या उत्साहामध्ये पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटक बाबाराव कोठे संपादक विदर्भ सप्तशृंगी साप्ताहिक कळमेश्वर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रूपाली राहुल मनोहर, पंचायत समिती सभापती नागपूर,प्रमुख पाहुणे बीएसपी माजी अध्यक्ष नागपूर जिल्हा सुप्रसिद्ध कव्वाल गायक अनिरुद्ध शेवाळे नागपूर,केंद्रीय कार्याध्यक्ष सेवा मंडळ नागपूर प्रमोद बागडे, मनोहर धनगरे,माजी वृद्ध कलावंत मानधन समिती सदस्य नागपूर,संगीत बाबू इंगळे,शाहीर गरिबा काळे, शाहीर मधुकर बांते,शाहीर नागोराव धावस,गायिका पल्लवी नगराळे,प्रबोधन कार शाहीर पुरुषोत्तम खांडेकर,प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कड

बे, शाहीर शंकर भोंगेकर, शाहीर संगीता जांभुळकर, कार्यक्रमाचे आयोजक शाहीर निनाद बागडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी दक्षिण नागपूर दिघोरी, पवनपुत्र नगर येथील रमाई महिला भजन मंडळाच्या गायिका, अर्चना मोटघरे,गायिका जोशना मेश्राम,वर्षा शेंडे, दीक्षा चव्हाण,सपना ढेकले,स्वाती वाघमारे, वंदना महेशकर,प्रबोधन कार भीम शाहीर प्रदीप कडबे,कार्यक्रमाचे आयोजक शाहीर निनाद बागडे यांच्या हस्ते मंडळाच्या सर्व सदस्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाहीर अंबादास नागदेवे,शाहीर शंकर भोंगेकर,गायिका पल्लवी नगरारे,प्रबोधनकार शाहीर पुरुषोत्तम खांडेकर शाहीर ब्रह्मा नवघरे,शाहीर विजय चकोले,शाहीर माधुरी पाटील,शाहीर वैशाली, शाहीर ज्ञानेश्वर पाटील, शाहीर बडगे,शाहीर सूर्यभान शेंडे,शाहीर विष्णू माटे युवा प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे, शाहीर रमेश रामटेके, शाहीर मोरेश्वर घरजाळे, शाहीर संगीता जांबुळकर, शाहीर अनिल वैद्य,शाहीर अडकणे,शाहीर संगीता महल्ले या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शाहीर निनाद बागडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर कालीचरण शेंडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments