Type Here to Get Search Results !

शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीच्या आढावा बैठकीचे आयोजन केज तालुका वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे-बी.व्ही मस्के

 शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीच्या आढावा बैठकीचे आयोजन


केज तालुका वंचित बहुजन  आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे-बी.व्ही मस्के



केज/प्रतिनिधी


शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीच्या आढावा बैठकीचे आयोजन

करण्यात आले असून तरी

केज तालुका वंचित बहुजन  आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांनी केले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वंचित बहुजन आघाडी केज तालुका पदाधिकारी,शाखा अध्यक्ष,शाखा कार्यकारणी, आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून  दिनांक१९ ऑगस्ट २०२४ रोजी ठीक १२-३० वाजता शासकीय विश्रामगृह केज येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

सध्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने सदर आढावा बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीस सर्व वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकारणी, ओबीसी संघटना यांना सुचित करण्यात येते की, ॲड. बाळासाहेब दत्ता प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा २२ जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली असून औरंगाबाद येथे मंडळ दिवस साजरा करून  आरक्षण बचाव यात्रा संपन्न झाली आहे. 

आरक्षण बचाव यात्रे मागील ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे एकच उद्दिष्ट होते की, ते म्हणजे  ओबीसी आणि मराठा समाज यामध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची अशी भूमिका आहे. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी गरीब मराठा यांना आरक्षण मिळावे अशी त्यांची भूमिका आहे ओबीसी,एस.सी.,एस.टी.यांचे आरक्षण  धोक्यात आहे. त्याकरिता सदर बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाबासाहेब विठ्ठल मस्के यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments