Type Here to Get Search Results !

साने गुरुजी निवासी विद्यालय, केज येथे मतदान प्रक्रिया द्वारे शालेय प्रतिनिधीची निवड करण्यात आली

 साने गुरुजी निवासी विद्यालय, केज येथे मतदान प्रक्रिया द्वारे शालेय प्रतिनिधीची निवड करण्यात आली



केज/प्रतिनिधी


बीड जिल्हा ऊसतोड कामगार विकास मंडळ, केज संचलित साने गुरुजी निवासी प्रा.मा.उच्च माध्यमिक विद्यालय केज येथे विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीत मतदानाचे महत्व व प्रत्यक्ष माहिती व्हावी या करिता भारतीय लोकशाही प्रणाली प्रमाणे शालेय विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक पार पडली.शालेय निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणूक घेतात त्याच प्रमाणे ही निवडणूक घेण्यात आली. सर्वप्रथम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवसाचा अवधि देण्यात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेणे,अर्जाची छाननी करने,वैध उमेदवाराची यादी निवडणूक चिन्हासह घोषित करणे,उमेदवाराला प्रचार करण्यासाठी विहित कालावधी देण्यात आला. मतदानादिवशी मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रतिनिधी यांच्या देखरेखीखाली पुर्ण मतदान प्रक्रिया पार पाडली.साने गुरुजी निवासी प्रा.मा.उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविताताई गित्ते/कराड मँडम यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून चोख भुमिका बजावली झालेल्या मतदानाची मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला. यात विजयी उमेदवार पुढील प्रमाणे,शालेय प्रतिनिधी पुरुष गट चि.तिडके ओमकार सुभाष, महिला प्रतिनिधी कु.चौरे प्रांजली चंद्रसेन, सांस्कृतिक प्रतिनिधी चि.मुंडे हनुमंत निवृत्ती, कु.नाईकवाडे दिपाली विनायक, क्रीडा प्रतिनिधी चि.फड निवृत्ती तुषार, कु. सांगळे अमृता पंडित, व स्वच्छता प्रतिनिधी म्हणून कु.मैंद प्रतिक्षा रामनाथ हे विजयी झाले. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तरकसे सर, पवार सर, सिरसट मॅडम, जोशी मॅडम, यांनी परिश्रम घेऊन पुर्ण मतदान प्रक्रिया पार पाडली. विजयी उमेदवारांना संस्थेचे अध्यक्ष एड. उद्धवराव कराड साहेब, उपाध्यक्ष राजेशजी कापसे सर, प्रा.डॉ. कविताताई कराड मँडम यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

0 Comments