Type Here to Get Search Results !

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी संपन्न.

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी संपन्न.

केज/प्रतिनिधी 

स्वानंद सार्वजनिक वाचनालय आनंदगांव ता. केज.येथे दि.१ ऑगस्ट २०२४ रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी परिसंवाद व चर्चासत्रघेवून संपन्न झाली.सर्वप्रथम लोकशाहिर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन,वंदन करण्यात आले.कमलाकर साबळे, गणेश गायकवाड,नितीन गायकवाड,हनुमंत गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,रामराजे गायकवाड,दादासाहेब गायकवाड,नारायण गायकवाड,छगन गायकवाड,रामराजे गायकवाड,गोविंद गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.त्यानंतर परिसंवाद व चर्चासत्र घेण्यात आली. या दोन्ही सत्रात गणेश गायकवाड,नितीन गायकवाड,हनुमंत गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,रामराजे गायकवाड,सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगन गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्ष स्थानी कमलाकर साबळे हे होते.यावेळी बी.आर. पौळ,बबन पुंड,रामदास राऊत,धरणीधर गायकवाड,उद्धव गायकवाड,रावसाहेब जाधव यांच्या सह वाचकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले तर आभार ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,माजी प्राचार्य,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक वसुदेव बप्पा गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

0 Comments