Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील अवैध धंद्यांचा बंदोबस्त करावा शिवसेनेकडून उपोषणाचा ईशारा.

 केज तालुक्यातील अवैध धंद्यांचा बंदोबस्त करावा शिवसेनेकडून उपोषणाचा ईशारा.



केज/प्रतिनिधी

 

केज पोलीस स्टेशन व युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचे जाळे फोफावत चालले आहे.

गुटखा-मटका ,अवैध गो-वाहतुक,अवैध दारू विक्री, अवैध वाळु उपसा,अवैध चंदन तस्करी,अवैध ॲानलाईन गेम, अवैध गांज्या विक्री व अनेक अवैध धंद्यामुळे कित्येकांना आपला जिव गमवावा तर लागतोच या व्यसनांमुळे कित्येकांची घरे उद्वस्त झाली आहेत. 

अशा व्यसनापायी अनेक जन बेघर होऊन देशोधडीला वाहुन चुकीच्या मार्गाकडे लागत आहेत, अनेक युवक अश्या व्यसनांच्या नादी लागल्याने गुन्हेगारीच्या कुठल्याही थराला जात आहेत , गुन्हेगारी वाढण्यासाठी कारणीभुत ठरणाऱ्या अवैध दारू विक्री,गुटखा,मटका अशा प्रकारच्या अवैध धंद्यावर पोलीसप्रशासणाच्या दुर्लक्षणामुळे फोफावत चाललेला हा केज पोलीस स्टेशन व युसुफवडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याचा सुळसुळाट ८ दिवसात बंद करण्याच यावा,अन्यथा दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी तहसील कार्यालय केज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला. 

स्वाक्षरी करून निवेदन देताना केज शिवसेना तालुकाप्रमुख अशोक जाधव,जिल्हासचिव रोहित कसबे,शहरप्रमुख तात्या रोडे,युवासेना तालुकाप्रमुख किशोर घुले,उपतालुकाप्रमुख सुभाष ठोंबरे,तालुका सचिव सखाराम वायबसे,ज्ञानेश्वर बोबडे,आप्पा कांबळे,पप्पू कोल्हे,रूषी घुले,बाबासाहेब देशमुख,पुरूषोत्तम घुले, नंदकिशोर गिते,कृष्णा केदार,अंगद देशमुख सह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments