Type Here to Get Search Results !

लक्ष्मण हाके यांची जरांगे पाटलावर सडकून टीका ओबीसीचे आरक्षण वाचविण्या साठी आझाद मैदानावर जाण्यासाठी तयार राहा- लक्ष्मण हाके

 केज तालुक्यातील अनेक ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे जंगी स्वागत


लक्ष्मण हाके यांची जरांगे पाटलावर सडकून टीका


ओबीसीचे आरक्षण वाचविण्या साठी आझाद मैदानावर जाण्यासाठी तयार राहा- लक्ष्मण हाके





केज /प्रतिनिधी 



केज तालुक्यातील अनेक ठिकाणी लक्ष्मण हाके यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. 

लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलावर सडकून टीका केली असून ओबीसी समाज बांधवांनी

आझाद मैदानावर जाण्यासाठी तयार राहावे असे त्यांनी आवाहन केले आहे. 

केज तालुक्यातील तुकुचीवाडी गावात लक्ष्मण हाके यांची जरांगे पाटलावर सडकून टीका करत ओबीसी आरक्षण बचावासाठी   लक्ष्मण हाके यांनी मोठा लढा उभारला आहे त्याना ओबीसी समाजातुन मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. 

 यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, आम्ही मागास आहोत आम्हाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या आधारे दिलेले आरक्षण हे सध्या धोक्यात आहे.  ओबीसीचे आरक्षण वाचण्यासाठी   आपण सर्वांनी मिळून एकत्रित येणे गरजेचे आहे. 

लक्ष्मण हाके यांनी तुकोचीवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने तुकोचीवाडी या गावांमध्ये जात असताना अनेक ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

सर्वप्रथम शिंदे फाटा येथे गप्पेवाडी,नामेवाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच येवता येथे सोनवणे वस्ती येथे सत्कार करण्यात आला व कोल्हेवाडी च्या वतीने चौफळा येथे लक्ष्मण हाके यांचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर जीवाचीवाडी येथे स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकात जीवाचीवाडी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी लक्ष्मण हाके यांच्या हस्ते स्व.गोपिनाथराव मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वदंन करण्यात आले. तसेच हनुमान मंदिर येथे लक्ष्मण हाके यांना वाजत गाजत यांचे स्वागत करण्यात आले तर तुकोचीवाडी येथील ग्रामस्थांनी डीजे वाजवत लक्ष्मण हाके यांचे अनोखे असे स्वागत करण्यात आले हाके यांच्या स्वागतासाठी जेसीबीच्या साह्याने फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली तर महिलांनी लक्ष्मण हाके  यांचे औक्षण केले यावेळी लक्ष्मण हाके यांनी बोलताना आपल्या भाषणात  म्हणाले की, मी ना खासदार ना आमदार तरी माझे एवढे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. पुढे बोलताना हाके  म्हणाले की, आम्ही मागास आहोत व आमचे आरक्षण कोणी हिसकावण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते कदापिही होऊ देणार नाहीत.

जरांगे पाटील म्हणतात आम्ही मागास आहोत आम्हाला आरक्षणाची गरज आहे

 जर तुम्ही मागास आहात तर तुम्ही कधी लॉन्ड्री चे काम केले आहे का? कधी तुम्ही नाव्ह्याचे काम केले आहे का? असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे त्यामुळे आम्ही मागास आहोत व आमचे आरक्षण हिसकाविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये व ते आम्ही कदापिही होऊ देणार नाहीत असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments