Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंदशाळेच्या विद्यार्थिनींचीजिल्हास्तरीय वक्तृत्व व बुद्धिबळ स्पर्धे साठी निवड.

 स्वामी विवेकानंदशाळेच्या विद्यार्थिनींचीजिल्हास्तरीय वक्तृत्व व बुद्धिबळ स्पर्धे साठी निवड.



केज/प्रतिनिधी 


ऑगस्ट जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेतील विद्यार्थिनीं नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व व बुद्धिबळ या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.गट साधन केंद्र केज यांच्या वतीने तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालविवाह प्रति बंधात्मक उपाययोजना या निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शाळेची विद्यार्थीनी कु.सय्यद जोया फातेमा जुबेर हिची जिल्हास्तरावर निवड झाली आहे तिने 'विज्ञान क्रीडा व अंतराळ या क्षेत्रात मुली झेप घेऊ शकतात का ?' हा विषय मांडला होता.तसेच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज येथे पार पडलेल्या बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये कु. श्रेया विनोद गुंड या विद्यार्थिनीची ही जिल्हा स्तरीय बुद्धीबळ स्पर्धे साठी निवड झाली आहे.

वरील यशस्वी विद्यार्थिनीं चे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरां च्या हस्ते सत्कारकरण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री.गिन्यानदेव गदळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सौ. शैलाताई इंगळे,श्री. नारायण अण्णा अंधारे, मुख्याध्यापिका सौ. शिवनंदा मुळे,प्राचार्य श्री. शंकर भैरट,सेवानिवृत्त  मु.अ.बी.व्ही.गोपाळघरे, श्री.बाळासाहेब तिडके, श्री.हनुमंत घाडगे तसेच सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments