Type Here to Get Search Results !

भगवा सप्ताहास प्रारंभ केज तालुक्यात पहिल्या दिवशी शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

 भगवा सप्ताहास प्रारंभ केज तालुक्यात पहिल्या दिवशी शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.



केज/प्रतिनिधी 


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे,युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते सुनील प्रभु,शिवसेना उपनेत्या सुषमाताईअंधारे, मराठवाडा समन्वयक उप नेते विश्वनाथ नेरूरकर, शिवसेना संपर्कप्रमुख बीड परशुराम जाधव,बीड लोकसभा प्रमुख सुनिल धांडे,सह संपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली उप जिल्हाप्रमुख दिपक मोराळे,तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली दि.४ आॕगष्ट रविवार रोजी भगव्या सप्ताहाच्या प्रथम  दिवशी केज तालुक्यातील उत्तरेश्वरपिंपरी याठिकाणी श्रीफळ फोडून चिंचोली माळी,वरपगाव येथे शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानालाप्रारंभ करण्यात आला.या सदस्य नोंदणी अभियानात शिव सैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच सर्वसामान्य गावकरी व शेतकरी यांनीही मोठ्या प्रमाणात शिवसेना सदस्य नोंदणी सहभाग घेतला.या वेळी बीड शिवसेनाजिल्हा सचिव रोहित कसबे,युवा सेना विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर भैय्या बोबडे,उप शहरप्रमुख अशोक कोल्हे, तालुका संघटक लक्ष्मण तात्या गलांडे,शाखाप्रमुख चिंचोली माळी राजेभाऊ, शाखाप्रमुख वरपगाव प्रदीप देशमुख,शाखा सचिव आप्पा कांबळे, अण्णासाहेब देशमुख, जय रमेश देशमुख,अरुण देशमुख बाळासाहेब देशमुख,दिनेश देशमुख विठ्ठल खंदारे,सुंदर अण्णा देशमुख व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments